नोकर भरती प्रकरणी काँग्रेसचं राज्यपालांना साकडं

गेल्या पंधरा ऑक्टोबरपासून विविध सरकारी खात्यात सुरु असलेली नोकर भरती प्रक्रिया रद्द करण्याबरोबरच या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी याची मागणी केली.
Goa Congress leaders visit governor P.S. Sreedharan Pillai for government job scam
Goa Congress leaders visit governor P.S. Sreedharan Pillai for government job scam Dainik Gomantak
Published on
Updated on

विविध सरकारी खात्यामध्ये नोकर भरती प्रकरणी (JOB Scam) होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आज काँग्रेसने (Goa Congress) राज्यपाल श्रीधरन पिल्लई (P.S. Sreedharan Pillai) यांना भेटून निवेदन सादर केले. गेल्या पंधरा ऑक्टोबरपासून विविध सरकारी खात्यात सुरु असलेली नोकर भरती प्रक्रिया रद्द करण्याबरोबरच या प्रकरणाची सीबीआयमार्फत (CBI) चौकशी करावी याची मागणी केली. राज्यपालांकडे गेलेल्यांमध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) अमरनाथ पणजीकरतसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (Goa Congress leaders visit governor P.S. Sreedharan Pillai for government job scam)

तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज दिला आहे. मोन्सेरात यांनी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, आमदार टोनी फर्नांडिस यांच्यासोबत पत्रकारांशी बोलताना नोकरभरती प्रकरणात शनिवारी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. आणि आताही त्यांनी नोकरभरती प्रकरणाचा पाठपुरावा करणे सुरू ठेवले आहे . सरकारात असूनही तुम्ही नोकर भरतीप्रकरणी संतप्त का झालात, असा प्रश्न केला असता, आम्ही वस्तुस्थिती सरकारसमोर न ठेवल्यास सर्वसामान्य जनता त्या विषयावर आवाज उठवेल का? असे ते म्हणाले. नोकर भरतीप्रकरणी जनतेकडून पुरावे, तक्रारी येणे अपेक्षित आहेच, शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरी देण्यासाठी लाच मागितली जात असल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांनीही बोलले पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान पीडब्ल्यूडी खात्यातील पदांसाठी उमेदवारांची यादी निश्‍चित होऊनही ती दोन दिवस सरकारने ठेवून घेतली. त्यामध्ये शिफारस केलेल्या उमेदवारांची नावे नसल्याने ती घोषित केली नाही. त्यानंतर ती शनिवारी घोषित केल्यावर ज्यांनी शिफारशी केल्या होत्या, त्यांच्या उमेदवारांची नावे नसल्याने या घोटाळ्याचा पर्दाफाश सत्ताधारी आमदारांनीच केला. त्यामुळे सरकारला त्यांच्या आमदारांना स्पष्टीकरण देणे भाग पडणार आहे, असे काँग्रेस युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले.

Goa Congress leaders visit governor P.S. Sreedharan Pillai for government job scam
नोकरभरती घोटाळाप्रकरण मोन्सेरात उच्च न्यायालयात, तर काँग्रेसही आक्रमक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com