Indian Super League Football:  Dainik Gomantak
गोवा

ISL Football: एफसी गोवा संघाला झटका; हुकमी खेळाडू जायबंदी झाल्याने 'आयएसएल'मधून बाहेर

मोहन बागान सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात उजव्या पायाला झाली होती दुखापत

किशोर पेटकर

Indian Super League Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग नऊ सामने अपराजित असलेल्या एफसी गोवा संघाला जबर झटका बसला आहे. हुकमी खेळाडू स्पॅनिश मध्यरक्षक व्हिक्टर रॉड्रिगेझ दुखापतीमुळे 2023-24 मधील बाकी मोसम खेळू शकणार नाही.

गतआठवड्यात एफसी गोवाने कोलकाता येथे एफसी गोवाने मोहन बागान सुपर जायंट्सला 4-1 फरकाने हरविले. त्या लढतीत व्हिक्टरने एक गोल केला होता, मात्र याच लढतीत त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली.

दुखावलेल्या पायाची सखोल वैद्यकीय चाचणी केल्यानंतर 34 वर्षीय खेळाडू बाकी मोसम एफसी गोवा संघाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही हे सिद्ध झाले.

व्हिक्टरने यंदा आयएसएल स्पर्धेतील नऊ सामन्यांत तीन गोल केले आहेत. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवातर्फे तो सहा सामन्यांत सार्टिंग लिस्टमध्ये होता, तर तीन सामने बदली खेळाडू होता.

गतमोसमात ओडिशा एफसीतर्फे खेळलेल्या व्हिक्टरला एफसी गोवाने जुलै 2023 मध्ये करारबद्ध केले होते. एफसी गोवा संघाने सध्या आयएसएल स्पर्धेत सात विजय व दोन बरोबरी या अपराजित कामगिरीसह 23 गुणांची कमाई केली आहे.

त्यांचा पुढील सामना शुक्रवारी (ता. 29) गुवाहाटी येथे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध खेळला जाईल. व्हिक्टर रॉड्रिग्ज अनुपलब्ध ठरल्यामुळे आता एफसी गोवास बदली खेळाडूसाठी जानेवारी महिन्यातील ट्रान्सफर विंडोची प्रतीक्षा करावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Decision Making Skills: निर्णय घेताय? थोडं थांबा, आधी स्वतःला विचारा हा एक प्रश्न!

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सला धक्का? जसप्रीत बुमराहने नाकारली उपकर्णधारपदाची ऑफर; काय आहे नेमके कारण?

Gold Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण; PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम की डॉलरच्या मजबुतीचा फटका?

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

SCROLL FOR NEXT