Goa ITI: गोवा हे पर्यटन इकॉनॉमी असलेले राज्य आहे. येथील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील कुशल कामगारांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात होते.
त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता गोव्यातील आयआयटीमधील प्रशिक्षणार्थींना टाटा ग्रुपमधील महत्वाची कंपनी असलेल्या इंडियन हॉटेल्सतर्फे (ताज हॉटेल्स) आदरातिथ्य कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
गोव्यातील कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय (DSDE) आणि The Indian Hotels Company Limited (IHCL) यांच्यात लवकरच याबाबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येणार आहे.
द इंडियन हॉटेल्स कंपनी गोव्यातील 9 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITIs) विविध ट्रेड्स सुरू करणार आहे.
यात फार्मगुडी, पणजी, डिचोली, सत्तारी, पेडणे, वास्को, मडगाव, काणकोण आणि काकोडा येथील आयटीआयचा समावेश आहे. येथे सुरू करण्यात येणाऱ्या ट्रेड्समध्ये फूड अँड बेव्हरेजेस (F&B) सर्व्हिस असिस्टंट, हाऊसकीपिंग अँड फूड प्रॉडक्शन इत्यादींचा समावेश आहे.
मडगाव, काणकोण, पणजी, वास्को, पेडणे, सत्तरी आणि फार्मागुडी यासह अनेक सरकारी आयटीआयनी याआधीच किमान एक आतिथ्य क्षेत्रातील ट्रेड सुरू केला आहे.
संचालनालयाने या व्यवसायांची दुहेरी प्रशिक्षण प्रणाली (DST) अंतर्गत रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि ही भागीदारी देखील DST अंतर्गत येते.
प्रशिक्षणार्थींना याचे प्रमाणपत्र दिले जाईल. याचा फायदा रोजगारासाठी होणार आहे.
कोणत्या आयटीआय मध्ये कोणते प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याविषयी...
आयटीआय कौशल्य प्रशिक्षण
फार्मागुडी आयटीआय फूड अँड बेव्हरेजीस असिस्टंट
पणजी आयटीआय फूड अँड बेव्हरेजीस असिस्टंट अँड हाऊसकीपर
डिचोली आयटीआय येथे काही नवीन ट्रेड्स सुरू होणार आहेत.
सत्तरी आयटीआय फूड अँड बेव्हरेजीस असिस्टंट
पेडणे आयटीआय फूड अँड बेव्हरेजीस असिस्टंट
वास्को आयटीआय फूड अँड बेव्हरेजीस असिस्टंट
मडगाव आयटीआय फूड अँड बेव्हरेजीस असिस्टंट, हाऊसकीपर अँड फूड प्रोडक्शन
काणकोण आयटीआय फूड अँड बेव्हरेजीस असिस्टंट, हाऊसकीपर अँड फूड प्रोडक्शन
काकोडा आयटीआय फूड अँड बेव्हरेजीस असिस्टंट, हाऊसकीपर अँड फूड प्रोडक्शन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.