Sunburn 2023 Goa Dainik Gomantak
गोवा

Sunburn 2023 Goa: ‘सनबर्न’ची खरीच गरज आहे का?

Sunburn 2023 Goa: काँग्रेसचा सवाल : राज्यात डान्सबारच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय

दैनिक गोमन्तक

Sunburn 2023 Goa: गोव्याला सनबर्नने काय दिले? अशा कार्यक्रमाची राज्याला खरोखरच गरज आहे काय? असा सवाल करीत काँग्रेसने आज राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणावर टीका केली.

विधानसभेत यापूर्वी सनबर्न हा कार्यक्रम नसून ड्रग्समाफियांचा हा व्यवहार असल्याचे म्हटले होते.

राज्यात डान्सबारच्या नावाने वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी केला.

काँग्रेस भवनात गुरुवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक सनबर्न कार्यक्रमाच्या ठिकाणी अमलीपदार्थ येऊ देणार नाही, स्कॅनर बसविणार असे सांगितले आहे, ही यंत्रणा कोणाच्या पैशातून उभारली जाणार आहे? असा सवाल भिके यांनी केला.

सनबर्न कार्यक्रमातून यापूर्वीची थकीत रक्कम वसूल केली आहे का? ध्वनिप्रदूषण प्रकरणी राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे.

सनबर्न आणून त्याला प्रोत्साहन देऊन आपली संस्कृती संपुष्टात आणली जात आहे. हा संगीत कार्यक्रम नसून दोन-तीन वर्षांत राज्यात ५०० किलोच्यावर अमलीपदार्थ पकडला आहे, असे भिके म्हणाले.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे परराज्यातून व विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी तपासणी अनिवार्य करावी.

सनबर्नसारख्या कार्यक्रमालाही मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार असल्याने आरोग्य खात्याने त्वरित यावर काही नियम लागू करावे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT