CM Pramod Sawant: युवकांनी ड्रग्‍सच्‍या व्‍यवसायापासून दूर रहावे

CM Pramod Sawant: स्वच्छ व सुंदर पर्यटनाला राज्य सरकार चालना देत आहे. त्यामुळे अमलीपदार्थविरोधी कारवाई सक्तीने केली जाते.
CM Pramod Sawant in Telangana
CM Pramod Sawant in TelanganaDainik Gomantak

CM Pramod Sawant in Telangana: स्वच्छ व सुंदर पर्यटनाला राज्य सरकार चालना देत आहे. त्यामुळे अमलीपदार्थविरोधी कारवाई सक्तीने केली जाते.

गोमंतकीय युवकांनी अमलीपदार्थ व्यवहारातून मिळणाऱ्या पैशांच्या प्रलोभनापासून दूर रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केले.

CM Pramod Sawant in Telangana
Pub House: एम. के. पब हाऊस कायमचे बंद करा; प्रस्ताव दाखल

गेल्या 1 जानेवारीपासून आजवर 8 कोटी 38 लाख रुपयांचे अमलीपदार्थ विविध पोलिस ठाणी व पोलिसांच्या अमलीपदार्थ विभागाने जप्त केले आहेत. कुंडई येथील वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पात या अमलीपदार्थांची दर सहा महिन्यांनी विल्हेवाट लावण्यात येते.

या व्‍यवहारात गुंतलेल्यांवर सरकारची बारीक नजर आहे. यातून कोणी सुटू शकणार नाही. यामुळे गोमंतकीय युवकांनी अमलीपदार्थांच्या व्यवहारापासून चार हात लांब रहावे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

गेल्‍या वर्षभरात 197 जणांना याप्रकरणी अटक केली आहे. यात गोमंतकीय किती आणि बिगरगोमतंकीय किती, यात न जाता गोमंतकीयांनी जास्‍त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी आपले आयुष्‍य बरबाद करू नये असे सरकारचे आवाहन आहे.

गोवा म्हणजे अमलीपदार्थ असे समीकरण मांडण्याचा चुकीचा प्रयत्न होत असल्याचे सांगून मुख्‍यमंत्री म्हणाले, यावर्षी अमलीपदार्थ व्यवहार विषयक 204 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सरकार सक्तीने कारवाई करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com