Single Use Plastic Ban Dainik Gomantak
गोवा

'सिंगल यूज' प्लास्टिक आरोग्यासाठी धोकादायक?

प्लास्टिकमुळे आपले वातावरण प्रदूषित होते, ज्याचे आरोग्यावर अनेक घातक परिणाम होतात. आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत की प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी कसा धोका बनत आहे.

दैनिक गोमन्तक

प्लास्टिकचा आरोग्यावर घातक परिणाम : केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. भारतातील 'कचरा प्रदूषणाचा' सर्वात मोठा स्रोत प्लास्टिक बनला आहे. देशात दरवर्षी सुमारे 14 दशलक्ष टन प्लास्टिकचा वापर होत असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणावर पसरतो.

(Is single use plastic dangerous to health)

प्लास्टिक हे लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. प्लॅस्टिकचा वापर आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतो हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

तज्ञ काय म्हणतात?

सर गंगाराम हॉस्पिटल (नवी दिल्ली) च्या फिजिशियन डॉ. सोनिया रावत यांच्या मते, प्लास्टिकचा आपल्या आरोग्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे परिणाम होतो. शतकानुशतके प्लास्टिकचे विघटन होत नाही आणि त्यामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि मातीचे प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक समुद्रात पोहोचते आणि समुद्रातील प्राणी ते प्लास्टिक गिळतात. समुद्रातून काढलेले मासे आणि इतर सीफूड खाल्ल्याने प्लास्टिकचे तुकडे माणसाच्या पोटात पोहोचतात आणि आतड्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.

पॅकेजिंगमध्ये रसायने वापरली जातात?

डॉ. सोनिया रावत यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये रसायनांचा वापर केला जातो, त्यामुळे लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर विपरित परिणाम होतो. सर्व लोकांनी प्लास्टिकच्या डब्यात खाद्यपदार्थ पॅक करणे टाळावे आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी बांबू किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर करावा.

पर्यावरणाचे नुकसान

डॉक्टरांच्या मते, कधी प्लास्टिकचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो तर कधी अप्रत्यक्षरीत्या हानी होते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर जपून करावा. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची गंभीर हानी होत असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्लास्टिकचा वापर बंद केला तर पर्यावरणातील अनेक प्रकारचे प्रदूषण कमी होऊन ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT