Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी मनगटातून आरपार; पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीचे मांडीचे हाड मोडले...

म्हापसा पोलिसांकडून घटनेची चौकशी

Akshay Nirmale

Goa Crime News: सर्व्हिस रिव्हॉल्व्हर साफ करत असताना चुकून गोळी झाडली जाऊन एक जण जखमी झाल्याचा प्रकार म्हापशातून समोर आला आहे. आरआरबी पोलिस उपनिरीक्षकाच्या (पीएसआय) अधिकाऱ्याच्या गिरी येथील घरात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे. यात या अधिकाऱ्याची पत्नी जखमी झाली आहे.

कुतुहलापोटी सरकारी पिस्तुल बघत असताना त्यातून अचानक गोळी सुटली. यात अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मनगटातून गोळी आरपार जाऊन ती डाव्या मांडीत घुसली. या घटनेत त्यांचे मनगटाचे आणि मांडीचे हाड मोडले आहे. त्यांच्यावर गोमॅकॉमध्ये उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. एकूणच या प्रकाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे. म्हापसा पोलिसांनी प्राथमिक चौकशीला सुरवात केली आहे. पण, अद्याप अधिकाऱ्याच्या पत्नीचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. बंदुक साफ करताना चूकून गोळी झाडली गेली, इतकीच माहिती अद्याप समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT