IRB Constable Amit Naik Dismissed Dainik Gomantak
गोवा

Goa Police: चुकीला माफी नाही! सुलेमान खानला पलायन करण्यास मदत करणाऱ्या कॉन्स्टेबलची नोकरीतून हकालपट्टी

Suleman Khan Escape: तपासासाठी पोलिसांची विविध पथके कर्नाटकात रवाना करण्यात आली. अखेर उशीरा रात्री हुबळी येथे अमित नाईक पोलिसांना शरण आला.

Pramod Yadav

पणजी: जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच विविध गुह्यात सहभागी असलेल्या सुलेमान खानला कोठडीतून पलायन करण्यास मदत करणाऱ्या आयआरबी कॉन्स्टेबलची नोकरीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल अमित नाईक शुक्रवारी उशीरा रात्री हुबळी येथे पोलिसांना शरण आला होता. पोलिसांनी त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करत नोकरीतून काढून टाकले.

भू-बळकाव प्रकरणातील सराईत सुलेमानला अमित नाईक याने गुन्हे शाखेच्या कोठडीतून बाहेर काढत स्वत:च्या दुचाकीवरुन फरार केले. दोघेही कर्नाटकच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमधून समोर आले. खान फरार झाल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली होती. दोघांच्या तपासासाठी पोलिसांची विविध पथके कर्नाटकात रवाना करण्यात आली. अखेर उशीरा रात्री हुबळी येथे अमित नाईक पोलिसांना शरण आला.

शरण आलेल्या अमित नाईकवर पोलिसांनी शिस्तभंगाची कारवाई करत नोकरीतून हकालपट्टी केलीय. सुलेमान खानला मदत करण्यासह इतर गोष्टीप्रकरणी अमित नाईकला कारवाईचा सामना करावा लागत आहे. दोघांनी पलायन केल्यानंतर रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात उच्च स्तरीय बैठक पार पडली होती. यावेळी नाईकवर योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.

अमित नाईक कोण आहे?

नाईक या आडनावावरुन गोमंतकीय वाटणारा आयआरबीचा कॉन्स्टेबल अमित मूळचा कर्नाटकातील आहे. सध्या तो जयरामनगर- दाबोळी येथे राहायला असून, त्यांचा चांगला बंगला आहे. वडिलांचे मिक्सर दुरुस्तीचे दुकान आहे. याशिवाय काही दुकाने त्याने भाड्याने दिली आहेत. अमित कर्तव्यावर असताना इतरांवर दादागिरी करायचा असे माहिती समोर आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT