Khandepar: रात्रीच्या अंंधारात बेकायदा रेती उत्खनन! बागवाडा - खांडेपार भागात माफियांचा सुळसुळाट; स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा

Bagwada Khandepar Illegal Sand Mining: बागवाडा - खांडेपार येथील सर्वे क्रमांक १७६ मध्ये बेकायदा रेती उत्खनन जोरात सुरू असून बेकायदेशीरपणे पंप टाकून मोठ्या प्रमाणात ही रेती खेचली जात आहे.
Bagwada Khandepar Illegal Sand Mining
Bagwada Khandepar Illegal Sand MiningDainik Gomantak
Published on
Updated on

Bagwada Khandepar Illegal Sand Mining

फोंडा: बागवाडा - खांडेपार येथील सर्वे क्रमांक १७६ मध्ये बेकायदा रेती उत्खनन जोरात सुरू असून बेकायदेशीरपणे पंप टाकून मोठ्या प्रमाणात ही रेती खेचली जाते, आणि रात्रीच्या अंधारात ट्रकमध्ये भरून नेली जात आहे, यावर सरकार अजूनही डोळे झाकून का आहे, असा सवाल करून दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर सबंध खांडेपार भागातील लोकांना विश्‍वासात घेऊन याप्रकरणी आवाज उठवू ,असा इशारा ‘मगो’चे फोंड्यातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

फोंड्यात आज (शुक्रवारी) झालेल्या या पत्रकार परिषदेत केतन भाटीकर यांनी कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या प्रभाग एक आणि प्रभाग दोनमध्ये चाललेल्या या अंदाधूंद रेती माफिया गैरव्यवहाराचा पर्दाफाश करून काही पुरावेही दिले. या बेकायदा रेती उत्खननात काही पंचसदस्य आणि फोंडा पालिकेचे काही नगरसेवक गुंतल्याचाही आरोप केतन भाटीकर यांंनी करून फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक याप्रकरणी गप्प का, असा सवाल केला.

बागवाडा - खांडेपार येथील नागरिकांनीच याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. बागवाडा येथून रेती उत्खननासाठी नवीन रस्ता तयार केला जात आहे. हे सगळे बेकायदेशीर असून याप्रकरणी फोंडा पोलिस, नगर नियोजन खाते आणि वन खात्याने जर कारवाई केली नाही तर या भागातील घराघरांत या प्रकाराविषयी माहिती देऊन आंदोलन उभारू, असा इशाराही केतन भाटीकर यांनी दिला.

Bagwada Khandepar Illegal Sand Mining
धक्कादायक! 'दयानंद' योजनेचे लाभार्थी परदेशात; 4 हजार नावे हयात नसल्याची माहिती उघड

रेती माफियांचे गैरकृत्य

राज्यात रेती उत्खननावर बंदी आहे. मात्र बागवाडा - खांडेपार येथील नदीतून बेकायदा रेती उत्खनन केली जाते. हा प्रकार रात्रीच्या अंंधारात चालत असून रात्रीच ट्रकमधून या रेतीची वाहतूक केली जाते. रेतीवाहू ट्रकांच्या अंदाधूंंद वाहतुकीमुळे खांडेपार तसेच कुर्टी भागात रात्रीच्यावेळी गुरांना हे ट्रक धडकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हा गैर प्रकार त्वरित बंद करावेत,अशी मागणी स्थानकांनी केली आहे.

Bagwada Khandepar Illegal Sand Mining
Vasco Akkalkot: स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी! वास्को ते अक्कलकोट थेट बससेवा सुरु

सक्शन पंपचा होतोय वापर...

रेती उपसा मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सक्शन पंपचा वापर होत आहे. हा प्रकार रेती माफियांकडून चालला असून आता तर नदीच्या किनारी थेट वाहने नेण्यासाठी रस्ताही तयार केला जात आहे. मात्र सरकारी यंत्रणा गप्प असून पोलिस काय करीत आहेत, नगर नियोजन खाते आणि वन खाते काय करीत आहेत, असा सवाल केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com