Goa Drug Case: Dainik GFomantak
गोवा

Goa Drug Case: ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी इराणी नागरिकाला अटक...

Goa Drug Case: इराणी नागरिकाकडून तब्बल 12.65 लाख रुपयांचे ड्रग्ज तसेच रोकड जप्त केली आहे.

Shreya Dewalkar

Goa Drug Case:

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. दरम्यान, कडेकोट बंदोबस्त असून, गुन्हे शाखेने इराणी नागरिकाकडून 12.65 लाख रुपयांचे ड्रग्ज तसेच रोकड जप्त केली आहे. या आरोपीला अटक करण्यात आलेली असून

गुन्हे शाखा गोवा रायबंदरचे पीआय लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा पीएस, तसेच रायबंदरच्या कर्मचाऱ्यांसह हणजूणे येथे अंमली पदार्थांवर छापा टाकत आरोपी हमीद ज़ा घोलम याला रंगेहात पकडले.

आरोपी व्यक्तीकडून 258 ग्रॅम गांजा, 52.190 ग्रॅम चरस, 4.110 ग्रॅम MDMA, 2.470 ग्रॅम एमडीएमए, तसेच 41 300 ची रोख रक्कम एक आयफोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, कायदा, 1985 चे 22 (b), 20 (b) (II) (A) अंतर्गत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

परदेशी कायद्याच्या उल्लंघनाबाबत स्वतंत्र गुन्हा नोंदवला जाईल. अशी माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.

दिवसभरातील दुसरी घटना

हरमल येथे नऊ लाखांच्या अमली पदार्थांसह इस्रायली नागरिकाला अटक करण्यात आली. मांद्रे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी (दि. 23 मार्च) ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून 136 ग्रॅम सुखलेल्या अळंबी ज्यात अमली पदार्थ सायलोसायबिन, 132 ग्रॅम सायलोसिबिनची पावडर व 140 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT