Gold Chain Snatching Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'सोनसाखळी चोर' इराणी गँग गोव्यात पुन्हा सक्रिय! मायणा-कुडतरी चोरी प्रकरणातील एकाला पुण्यातून अटक

Gold Chain Snatching Case: एकट्या-दुकट्या महिलांना हेरून त्यांच्या सोनसाखळ्या हिसकावून नेणारी पुण्यातील ‘इराणी गँग’ पुन्हा एकदा दक्षिण गोव्यात सक्रिय झाली आहे.

Sameer Amunekar

मडगाव: एकट्या-दुकट्या महिलांना हेरून त्यांच्या सोनसाखळ्या हिसकावून नेणारी पुण्यातील ‘इराणी गँग’ पुन्हा एकदा दक्षिण गोव्यात सक्रिय झाली असून, मायणा-कुडतरी पोलिसांनी आपल्या हद्दीत घडलेल्या एका चोरी प्रकरणात पुणे येथून याच गँगमधील एकाच्या मुसक्या आवळल्या. रहीम मिर्झा असे या संशयिताचे नाव असून, त्याला अटक करून पुढील चौकशीसाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे.

मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई पुढील तपास करीत आहेत. राय येथे बसथांब्यावर बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या सुषमा शिरोडकर या महिलेची सोनसाखळी बुलेटवरून आलेल्या एका युवकाने हिसकावून पळ काढला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना यात ‘इराणी गँग’ गुंतली असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी एक पथक पुणे येथे पाठवून दिले होते. या पथकाने रहीम याला पकडले.

दक्षिणेत उपद्रव

सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या घटना घडत असतात. २०२४ साली येथे अशाप्रकारच्या ८ तर २०२३ साली १० घटना घडल्या होत्या. घटना वाढत असतानाही चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने लोकही भयभीत झाले होते.

पोलिसांनी आता ‘इराणी गँग’च्या एकाला अटक केल्याने, यापूर्वी घडलेल्या अशा प्रकारच्या चोऱ्यांचा छडा लागेल, अशी आशा नागरिक बाळगून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT