Goa Pune Flight: हवेतील थरार! गोवा - पुणे विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली; धक्कादायक Video Viral

Goa Pune Flight Viral Video: फ्लाईट आणि प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही धोका होत नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
Spice jet Viral Video
Spice jet Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा – पुणे फ्लाईटचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्पाईस जेट कंपनीच्या विमानाच्या खिडकीची फ्रेम विमान हवेतच असताना निखळली. या घटनेचा व्हिडिओ एकाने सोशल मिडियावर शेअर केला असून, हा विषय चर्चेचा विषय ठरला आहे.

गोव्यातून पुण्याला जाणाऱ्या स्पाईज जेट कंपनीच्या एसजी-१०८० या विमानाने गोव्यातून उड्डाण घेतले. उड्डाण घेतल्यानंतर विमानातील खिडकीची फ्रेम अचानक निखळली यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

Spice jet Viral Video
Goa Politics: 'गांजा'वरुन आरोप करणाऱ्या विद्यमान आणि माजी आमदारांची चौकशी करा; 'आप' नेते पालेकरांची मागणी

“क्यु ४०० या फ्लाईटच्या खिडकीची फ्रेम अचानक उघडली. यामुळे उड्डाणात फ्लाईट तसेच प्रवाशांना कोणताही धोका निर्माण झाला नाही. निखळलेला भाग विमानाच्या मुख्य डिझाईनचा भाग नाही. ही फ्रेम मुख्य खिडकीला जोडलेली असते, यामुळे फ्लाईट आणि प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही धोका होत नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने याबाबतचा अनुभव सोशल मिडियावरुन शेअर केला आहे. "गोव्यातील एक कार्यक्रम आटोपून मी पुण्याला येत असताना मी विमानात होतो. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर खिडकीला सपोर्ट असणारी एक फ्रेम अचानक बाहेर आली. यामुळे खिडकी शेजारी लहान मुलाला घेऊन बसलेली महिला घाबरली. ही फ्रेम खिडकीसह बाहेरील दबावाविरोधात कवच म्हणून काम करते," ही चिंताजनक बाब असल्याचे मत या प्रवाशाने व्यक्त केले आहे.

अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघातात २६५ प्रवासी आणि काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर विमानांच्या सुरक्षेबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. अशात गोवा - पुणे विमानातील या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com