Sunburn
Sunburn Dainik Gomantak
गोवा

Sunburn: सनबर्नमध्ये भान नव्हे 'मोबाईल' हरवले; अनेक iphone चोरीला, तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात झुंबड

Pramod Yadav

गोव्यातील वागातोर येथे मागील दोन दिवसांपासून सनबर्न (Sunburn 2022 Goa) हा जगप्रसिद्ध संगीत मोहत्सव सुरू आहे. यासाठी जगभरातील पर्यटकांनी हजेरी लावली आहे. तसेच, नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक सध्या गोव्यात दाखल झाले आहेत. यासह चोरटे आणि ड्रग्ज विक्रेते देखील सक्रिय झाले आहेत. सनबर्नमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या महागड्या फोनवर सध्या चोरटे डल्ला मारत आहेत. हणजूण पोलिस (Anjuna Police) ठाण्यात गुरूवारी रात्री अनेकांनी मोबाईल चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी केली होती.

सनबर्नमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या महागड्या मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 70-80 पेक्षा अधिक लोकांनी हणजूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. विषेश म्हणजे यातील बहुतंशी लोकांचे आयफोन (Apple Iphone) चोरीला गेले आहेत.

कळंगुट येथे महाराष्ट्रातील दोन टोळ्या गजाआड

दरम्यान, गुरूवारी कळंगुट येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन टोळ्या गजाआड केल्या. यामध्ये पोलिसांनी बारा जणांना अटक करत त्यांच्याकडून आयफोनसह 41 मोबाईल जप्त केले. ही टोळी इनोव्हा गाडीने गोव्यात आली होती, ती गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. अटक टोळीचा महाराष्ट्राशी संबध असून, त्याची महाराष्ट्र पोलिसांकडून माहिती मागवण्यात आली आहे. सनबर्न EDM मध्ये ड्रग्ज आणमि मोबाईल चोरीचे प्रकार होत असतात. साध्या वेशातील पोलिस पथके किनारपट्टी भागात तैनात करण्यात आली आहेत असे निधीन वाल्सन यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT