पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या माता हिराबेन यांचं 100 व्या वर्षी निधन झालं आहे. निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी तातडीने अहमदाबादला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्विट करत हिराबेन यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती बुधवारी अचानक खालावली. यानंतर त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये हीराबेन यांची प्रकृती स्थिर असून त्या बऱ्या होत असल्याचे सांगण्यात आले आहे. कफाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. थंडीच्या मोसमात कफ येण्याच्या तक्रारीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. हा त्रास वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या.
हिराबा यांनी 18 जून 2022 रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना 11 मार्च रोजी रात्री 9 वाजता आई हीराबा यांना भेटण्यासाठी ते गांधीनगरला पोहोचले होते, जिथे त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते. तेव्हा पीएम मोदींनी त्यांच्यासोबत खिचडी खाल्ली होती.
तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी त्यांच्या आईची भेट घेतली. त्यावेळी पीएम मोदी त्यांच्या आईशेजारी बसलेले दिसले. तसेच पंतप्रधान मोदींनीही तिच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले होते.
दरम्यान गेल्या आठवड्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. प्रथम, त्यांचे बंधू प्रल्हाद मोदी कर्नाटकातील म्हैसूर येथे एका रस्ते अपघाताचा बळी ठरले. त्याचवेळी बुधवारी त्यांची आई हीराबेन यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांचं निधन झालं आहे.
कर्नाटकातील (Karnataka) म्हैसूरमध्ये मंगळवारी प्रल्हाद मोदींचा अपघात झाला. त्यांच्यासोबत मुलगा आणि सूनही होती. तिघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान रुग्णालयाने जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, सर्व लोक धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.