Football legend Pele Passed Away : मृत्यूशी झुंज अपयशी; जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पेले काळाच्या पडद्याआड

ब्राझीलला तीन वेळा वर्ल्डकप मिळवून देण्यात पेले यांचा सिंहाचा वाटा होता.
Pele
Pele Dainik Gomantak

मूळ नाव एडसन अरांतेस डो नासिमेंतो, परंतु पेले या दोन आद्याक्षरांनी संपूर्ण फुटबॉल आणि क्रीडा विश्वाला आपल्या जादुई खेळाने भूरळ पाडणाऱ्या या महान फुटबॉलपटूचे काल गुरुवारी रात्री उशिरा वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. फुटबॉल खेळाला सर्वांग सुंदर करणारे आद्य फुटबॉलपटू म्हणून पेले यांची ओळख होती. कतारमध्ये नुकत्याच संपलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेदरम्यान पेले यांची प्रकृती खालावली होती.

महान फुटबॉलपटू पेले गेल्या काही दिवसांपासून साओ पाउलोमधील एका रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. ब्राझीलला तीन वेळा वर्ल्डकप मिळवून देण्यात पेले यांचा सिंहाचा वाटा होता. प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांचं संपूर्ण नाव एड्‌सन आरेंटीस डू नाशसिमेंटू असं होतं. ब्राझीलमधील ट्रेस कुरसँइस येथील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. अगदी लहानपणापासूनच त्याला फुटबॉलची आवड होती. 

पेले यांना कोलोरेक्टर कन्सरचं निदान झालं होतं. प्रकृती खालवल्यामुळे पेले यांना साओ पाउलो येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु होते. कर्करोगाचं निदान उशिरा झाल्यामुळे पेले यांची तब्येत सातत्याने खालावत चालली होती. त्यांच्या किडनी आणि हृदयावरही कर्करोगामुळे विपरित परिणाम होत होता.

Pele
IPL 2023: मुंबई इंडियन्स संघात नव्या सदस्याची एन्ट्री, सांभाळणार महत्त्वाची जबाबदारी

फुटबॉलपटू पेलेची आजवरची 1363 सामान्यांमधील एकूण गोलसंख्या 1281 होती. 1 ऑक्टोबर 1977 रोजी, वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी पेले यांनी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. त्या काळातील इनसाइड फॉरवर्ड खेळणारा पेले सर्वोत्कृष्ट खेळाडू मानला जात होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com