International Yoga Day  Dainik Gomantak
गोवा

International Yoga Day 2023 : राष्ट्रीय पातळीवरील योगासनातील तिची झेप; कोण आहे जाणून घ्या ? लवचिक योगपटू

हवाई दलात पायलट बनण्‍याचे स्‍वप्‍न

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

नीरल वाडेकर ही अवघी दहा वर्षांची मुलगी. राष्ट्रीय पातळीवरील योगासनातील तिची झेप थक्क करणारी आहे. लवचिक शरीरयष्टीच्या या युवा योगनिपुण मुलींने योगाभ्यासात खूपच झोकून घेतले आहे. गोव्यातून महाराष्ट्रातील संगमनेर येथील योगासनात नावाजलेल्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये दाखल झाल्यानंतर तिची गुणवत्ता आणखीनच बहरली.

गोव्यासाठी पदके जिंकल्यानंतर महाराष्ट्रातर्फेही तिने पदकांचा तक्ता रिता होऊ दिला नाही. नृत्यकला, जिम्नॅस्टिक, कराटे असा प्रवास करत नीरल योगासनात रमली.

कोरोना महामारीपूर्वी कलागुण प्रदर्शित करणाऱ्या टीव्ही कार्यक्रमातही ती झळकली होती. मात्र कारकीर्द तिने योगासनातच केली. मूळ कुचेली-म्हापसा येथील नीरलची योगासनाची उपजत गुणवत्ता अचंबित करणारी आहे.

नीरलने गतवर्षी जून महिन्यात पंचकुला-हरियाणा येथे झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्यासाठी दोन सुवर्णपदके जिंकली आणि ती प्रकाशझोतात आली.

कलात्मक योगप्रकारात तिने अफलातून कौशल्य प्रदर्शित केले. यावर्षी मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना कलात्मक प्रकारात दोन रौप्यपदकांची कमाई केली.

दोन वर्षांपूर्वी गोव्यातर्फे राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सहभागी झालेल्या नीरलने पदके जिंकली. त्यानंतर ध्रुव ग्लोबल स्कूलने तिला मोठी संधी दिली.

तेथे तिला मुख्य प्रशिक्षक मंगेश खोपकर, तसेच प्रवीण व स्वप्‍लिन यांचे मार्गदर्शन लाभते. नीरलच्या पालकांनी तिला संगमनेरला पाठविण्याचा योग्य निर्णय घेतला आणि शास्त्रोक्त प्रशिक्षणाच्या जोरावर या जिगरबाज मुलीने राष्ट्रीय सुवर्णपदकापर्यंत भरारी घेतली.

हवाई दलात पायलट बनण्‍याचे स्‍वप्‍न

नीरलचे वडील महेश अमेरिकेत नोकरी करतात, आई किरण या कबड्डी व योग यामध्ये पारंगत असून प्रशिक्षण देतात. पालकांचे तिला भरीव प्रोत्साहन लाभत आहे. आईकडून योगविषयक उपयुक्त मार्गदर्शन होत असल्याने तिची वाटचाल अधिकच सुरळीत बनली.

भविष्यात योगाचा ऑलिंपिकमध्ये समावेश झाल्यास भारतासाठी पदक जिंकण्याचे आणि हवाई दलात पायलट बनून देशाची सेवा करण्याचे स्वप्न नीरलचे स्‍वप्‍न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT