Panaji : पहिल्याच पावसाने मिरामार सर्कल जलमय, स्मार्ट सिटीच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित

पावसाचा परिणाम : मिरामार येथे साचले पाणी
Rain
Rain Gomantak Digital Team

Panaji : बुधवारी (ता.१४) रात्री आठ-साडेआठच्या सुमारास पाऊस पडला आणि मिरामार सर्कल येथे पाणी साचले. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाविषयी प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. यावरून सध्या तरी थोडाच पडला; पण चुका दाखवून गेला, असे म्हणता येणे शक्य आहे.

पणजी पावसाळ्यात बुडणार, अशी भीत सर्व क्षेत्रातून व्यक्त होत आहे. आमदार तथा स्मार्ट सिटीवाले किंवा महापौर पाऊस पडू द्या, मगच समजेल असे म्हणू लागले आहेत. आमदार आणि महापौरांनी सध्या आपली स्मार्ट सिटीविषयी भाषाहीबदलली आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत गटारांची कामे केली गेली आहेत. मिरामार सर्कलभोवतालच्या गटाराची साफसफाई व सुशोभीकरण करण्यात आले आहे. परंतु गुरुवारी रात्री पडलेल्या पावसामुळे येथे पाणी साचल्याने स्मार्ट सिटीच्या कामाविषयी प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत.

Rain
Panaji : लोहिया मैदानावर जाहीर सभा; म्हादईप्रश्नी सरकार गंभीर नाही - निर्मला सावंत

घडलेल्या प्रकाराची दखल घेत आयुक्त क्लेन मेदेरा यांनी अधिकाऱ्यांसमवेत दुपारी मिरामार परिसराची पाहणी केली. पावसाचे पाणी साचण्यामागे येथील क्रॉससमोरील जागा उतरती असल्याने आणि पाणी जाण्यासाठी योग्यरीत्या उतरण नसल्याने पाणी साचून राहत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. गटारांचे काम केले आहे!

Rain
Panaji News : काकरा येथील होड्या जळितग्रस्तांना योग्य तीच भरपाई दिली - नीळकंठ हळर्णकर

पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचल्यास बांदोडकर मार्ग जलमय होण्यास वेळ लागत नाही. कारण याच ठिकाणाहून गटाराद्वारे पुढे पाणी समुद्रात जाते; परंतु गटारेच भरून वाहिल्यानंतर पाण्याचा योग्यपद्धतीने निचरा होत नसल्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे. त्यामुळे यामार्गावरील गटारांचे काम करण्यात आले आहे, असे महानगरपालिका अभियंत्यांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com