Goa Tourism: देशात येणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ; पर्यटनमंत्री जी. किसन रेड्डी

‘जी-२०’ पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचा समारोप
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: ‘जी-२०’ देशांच्या पर्यटन क्षेत्रात मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘गोवा डिक्लेरेशन’ची तयारी अंतिम टप्प्यात असून उद्या गोव्यात बुधवारी होणाऱ्या पर्यटनमंत्र्यांच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात येईल. गेल्या काही महिन्यात देशात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतीमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली आहे.

‘जी-२०’ अंतर्गत आयोजित केलेल्या  पर्यटन कार्यगटाच्या चौथी बैठक आज गोव्यात झाले. केंद्रीय पर्यटन, संस्कृती मंत्री  जी. किशन रेड्डी, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, अजय भट्ट आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री  रेड्डी म्हणाले,  गेल्या काही महिन्यांत कच्छ, सिलिगुडी आणि श्रीनगरमध्ये ‘जी-20’ पर्यटन कार्यगटाच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये जगभरातील तज्ञ, नवोन्मेषक आणि नेत्यांसोबत विविध  पर्यटन प्रकारांबाबत अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक आणि सकारात्मक चर्चा झाली.

Goa Tourism
Rumdamol-Davorlim: रुमडामळमध्ये पोलिसांची करडी नजर; सहा ठिकाणी पोलिस गस्त

भारत हे आध्यात्मिक पर्यटन आणि वारसा पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे, ही गोष्ट विशेष लक्षात घ्यायला हवी. तीर्थक्षेत्रे आणि वारसा स्थळांकडे पर्यटक आकर्षित व्हावेत, यासाठी, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने ‘प्रसाद’, अर्थात तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन योजना सुरू केली आहे.

- अजय भट्ट, पर्यटन राज्यमंत्री.

गोवा हे सुट्टीचा काळ व्‍यतीत करण्‍यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. नटलेले समुद्रकिनारे,  अद्‍भूत सांस्कृतिक इतिहासाचा अप्रतिम संगम येथे आहे आणि पूर्व आणि पश्चिम संस्कृतींचे अनोखे मिश्रण इथे पहायला मिळते.

- श्रीपाद  नाईक, पर्यटन राज्यमंत्री.

‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना 

‘वसुधैव कुटुंबकम’, या संकल्पनेखाली गोव्याचा अधिक समावेशक शाश्वत आणि समृद्ध जगाच्या दिशेने प्रवास सुरु आहे. गोवा हे ''पर्ल ऑफ द ओरिएंट'' म्हणून प्रसिद्ध अाहे.पर्यटकांना आकर्षित करत आहे. साहसी खेळ, जागतिक वारसा असलेला पश्चिम घाट. योग आणि निरामयता, अद्वितीय संस्कृती आणि वारसा यामुळे तो सर्वांना आवडतो.

- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा.

ग्रामीण पर्यटनावर भर

जानेवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत देशात आलेल्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत १६६ टक्के वाढ शाश्वत, लवचिक पर्यटन क्षेत्राच्या निर्मितीसाठी गोवा डिक्लेरेशन  महत्वाचे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने ग्रामीण पर्यटन स्थळांच्या विकासावर केंद्र सरकारचा भर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com