Purple Fest 2024 Dainik Gomantak
गोवा

Purple Fest 2024 : आंतरराष्ट्रीय ‘पर्पल फेस्ट’साठी सज्जता; दिव्यांगांना पाठबळ

गोमन्तक डिजिटल टीम

Purple Fest 2024 : पणजी, नॅशनल एचआरडी नेटवर्क, तसेच गोवा सरकारतर्फे ईएसजी येथे ८ ते १३ जानेवारीदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-२०२४ मध्ये ‘कॉर्पोरेट पॅगोडा’चे अनावरण करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

कॉर्पोरेट पॅगोडा हा दिव्यांग व्यक्तींचा उत्सव आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, इतर मंत्री आणि दिव्यांग विभागाच्या अन्य सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होईल.

कार्यकारी संचालक, बीएनआय गोवा प्रदेश, राजकुमार कामत, सपोर्ट डायरेक्टर, बीएनआय गोवा, निखिल शाह, एनएचआरडी डायव्हर्सिटी अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टचे कोअर डिझायनर, राजेश मेहता, एनएचआरडी राष्ट्रीय सरचिटणीस,

आनंद खोत, एनएचआरडी अध्यक्ष पुणे चॅप्टर, अमन राजाबली आणि सपोर्ट डायरेक्टर, बीएनआय गोवा, अर्च रिटा मोदी जोशी या मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

पत्रकार परिषदेत राजकुमार कामत म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींच्या विविध क्षमतांचा उत्सव साजरा करतानाच हा कार्यक्रम सर्वसमावेशकतेची वचनबद्धता दर्शवितो. वॉकथॉनपासून प्रभावी लेगोथेरपी कार्यशाळा आणि करिअर-केंद्रित कार्यशाळेपर्यंतचे उपक्रम खुल्या संभाषणांना चालना देण्यासाठी, समावेशक समाज निर्माण करण्यासाठी बनविले आहेत.

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टमध्ये सरकारी अधिकारी, एनजीओ, कॉर्पोरेट्स आणि व्यावसायिकांसह अन्य सन्माननीय मान्यवर सामील होण्यासाठी उत्सुक आहेत.

या अनोख्या कार्यक्रमातील अपेक्षित सहभागींमध्ये दिव्यांग समूह, एनजीओ आणि डीईआयबी समर्पित कॉर्पोरेट्स, एचआर व्यावसायिक, डीईआयबी प्रॅक्टिशनर्स, उद्योग व्यावसायिक, डीईआयबी शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी आणि सहयोगी यांचा समावेश आहे. यावेळी राजेश मेहता यांच्यासह इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

कसा असेल कॉर्पोरेट पॅगोडा

९ जानेवारी : विविधता आणि समावेशक वॉकथॉन तसेच मायक्रोसॉफ्ट एआय क्षमतांची प्रात्यक्षिके.

१० जानेवारी : ॲव्हां गर्द, विचार नेतृत्व मंच (थॉट लीडरशीप फोरमसारखे) उपक्रम.

११ जानेवारी : रोजी रोजगार साहाय्य कार्यशाळा आणि करियर केंद्रित कार्यशाळा.

१३ जानेवारी : न्यूरोडाइव्हर्स व्यक्तींसाठी ‘लेगो थेरपी’ कार्यशाळेने कार्यक्रमाचा समारोप.

८५० उद्योजकांचा सहभाग

वॉकथॉन कार्यक्रमाचा उद्देश दिव्यांगत्वासंबंधी खुल्या चर्चेला प्रोत्साहन देणे, मिथक दूर करणे आणि अधिक समावेशक मानसिकतेला प्रोत्साहन देणे, असा आहे. वॉकथॉनमध्ये दोन व्यक्तींची एक जोडी केली जाईल.

ते दोघे संभाषण करत एक किलोमीटर चालतील. बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल ही संस्था गोव्यातील ८५० पेक्षा जास्त एमएसएमई उद्योजक आणि व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी रेफरल मार्केटिंगद्वारे सदस्यत्व आधारावर मदत करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT