Bicholim News : पिळगाव आयडियल हायस्कूलमध्ये ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा

Bicholim News : नंतर बालिका वर्गातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पाजली वाहिली.
ideal highschool student
ideal highschool student Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News : डिचोली, पिळगाव येथील आयडियल हायस्कूलमध्ये ''बालिका दीन''''साजरा करण्यात आला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात आला.

आयडिअल हायस्कूलचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गावकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. नंतर बालिका वर्गातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पाजली वाहिली.

विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुभाष सावईकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख तथा जीवन संघर्षाची विशेष माहिती देऊन मुलांना मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थिनी जान्हवी पार्सेकर हिने याप्रसंगी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थांना प्रोत्साहन दिले.

ideal highschool student
Goa University: गोवा विद्यापीठाच्या मेगनला डायव्हिंगमध्ये पदके

आदिष्टी बांदेकर व प्रियांसी जल्मी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादर करून ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ या नाऱ्याने कार्यक्रमाची सांगता केली. आयडिअल हायस्कूलचे संस्थापक रामचंद्र गर्दे, ज्येष्ठ शिक्षिका साधना साखळकर आणि इतर शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com