Goa Budget Session: अयोध्येतील ‘श्री राम निवास’साठी 25 कोटी! जागा सरकारच्या ताब्यात; रामलल्लाच्या भाविकांसाठी CM सावंतांनी दिली खूशखबर

Shri Ram Niwas Ayodhya Goa: मुख्यमंत्री म्हणाले की, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे गोवा सरकारतर्फे ‘श्री राम निवास’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
Shri Ram Niwas Ayodhya Goa
Shri Ram Niwas Ayodhya GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अयोध्या येथे श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या गोमंतकीयांची सोय व्हावी, यासाठी अयोध्येत गोवा भवन उभारण्याच्या हालचालींबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुढची माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली.

गोवा सरकारने पायाभूत सुविधा व धार्मिक-सांस्कृतिक प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. राज्य सरकारने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून विविध विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे गोवा सरकारतर्फे ‘श्री राम निवास’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा ताबा सरकारने घेतला आहे. या ठिकाणी गोव्यातील भाविक आणि पर्यटकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे.

Shri Ram Niwas Ayodhya Goa
Goa Budget Session: 14 दिवसांचे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन! कलम 39 A वलयांकित; अनेक विषय ऐरणीवर

त्यांनी पुढे सांगितले की, ‘श्री राम निवास’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अयोध्येला भेट देणाऱ्या गोमंतकीय भाविकांना स्वस्त आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था मिळेल. यामुळे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Shri Ram Niwas Ayodhya Goa
Goa Budget 2026: अर्थसंकल्पात शिक्षणाचा 'बूस्टर डोस'! 1,100 तासांचे शिक्षण आणि कौशल्य विकासावर मोठा भर, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

दरम्यान, सरकार विविध क्षेत्रांत पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. जीपीएआरडीसाठी मंजूर केलेल्या निधीतून प्रशिक्षण, संशोधन आणि प्रशासनिक क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे विकासकामांना गती मिळण्याबरोबरच राज्यातील नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ayodhya Donation Scam
Arvind Kejriwal On Ram Mandir Donation Theft
DR. Ram Manohar Lohia Journey:
 80th Anniversary DR Ram Manohar Lohia
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com