अनाथांना सरकारी नोकरीत आरक्षण, शिक्षणातही मोठा कोटा; मुख्यमंत्री सावंतांचा मास्टरस्ट्रोक, 'सप्तपदी' अर्थसंकल्पात केल्या 'या' मोठ्या घोषणा

Goa Budget 2026 CM Pramod Sawant:गोव्याच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरला.
Goa Budget 2026
Goa Budget 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत आपल्या कारकिर्दीतील सातवा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक तरतुदींचा दस्तावेज नसून, तो गोव्याच्या सामाजिक आणि पायाभूत विकासाचा एक व्यापक आराखडा आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीचा आढावा घेताना 'आनंद निर्देशांक' आणि 'मानव संसाधन विकास' यामध्ये झालेली सुधारणा अधोरेखित केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करत, गोवा 'विकसित भारता'च्या ध्येयाकडे वेगाने पाऊल टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.

Goa Budget 2026
Goa Education: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! गोव्यात लागू होणार ‘त्रिसूत्री भाषा’ पद्धत; ‘नापास नाही’ पद्धत राहणार कायम

'सरकार तुमच्या दारी'चा प्रत्येक पंचायतीत विस्तार

प्रशासकीय पारदर्शकता आणि वेगवान सेवा देण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या वर्षापासून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम राबवला जाणार आहे. यापूर्वी काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या या उपक्रमाला आता सर्वव्यापी स्वरूप देण्यात येणार आहे.

यामुळे ग्रामीण भागातील जनतेला सरकारी दाखले, योजनांचे अर्ज किंवा अन्य सेवांसाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही. शासन स्वतः जनतेच्या उंबरठ्यावर येऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करेल, असा हा अभिनव उपक्रम आहे.

अनाथांसाठी आरक्षणाचे कवच आणि शिक्षणात विशेष कोटा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आजच्या अर्थसंकल्पात एक अत्यंत संवेदनशील आणि क्रांतिकारी निर्णय जाहीर केला. समाजातील उपेक्षित घटकांसाठी, विशेषतः अनाथांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली.

इतकेच नव्हे, तर शैक्षणिक संस्थांमध्येही त्यांच्यासाठी विशेष कोटा (Reservation) राखीव ठेवला जाणार आहे. या निर्णयामुळे अनाथांना सन्मानाने जगण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या मानवी दृष्टिकोनाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Goa Budget 2026
Goa Crime: किळसवाणा प्रकार! गर्भवती महिलेस केले अश्लील मेसेज - व्हिडीओ कॉल, बीडच्या मूकबधिर व्यक्तीस जामीन

राज्यातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी सध्या ७,५३२ कोटी रुपयांचे तब्बल ३५४ विकास प्रकल्प युद्धपातळीवर राबवले जात आहेत. रस्ते, पूल आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था यांमुळे गोव्याच्या आर्थिक प्रगतीला नवी गती मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

यासोबतच, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांच्या स्मृतीला उजाळा देणारा प्रकल्पही सरकारने पूर्णत्वास नेला आहे. मिरामार येथील भाऊसाहेब बांदोडकर यांचे भव्य स्मारक याच वर्षी पूर्ण होऊन जनतेसाठी खुले होणार असल्याची आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांनी दिली. या अर्थसंकल्पाने भविष्यातील 'स्वयंपूर्ण' आणि 'विकसित' गोव्याचा पाया अधिक भक्कम केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com