Goa Theft Case: पर्वरीत बाईक आणि मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Theft Case: पर्वरी पोलिसांची मोठी कारवाई
Goa Theft Case
Goa Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Theft Case: शनिवारी 6 जानेवारी रोजी पर्वरी पोलिसांनी मोटार सायकल आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय.

या चोरी प्रकरणी शब्बीर बल्लूर हजरत अली (वय 24 वर्षे, रा. वेरे बार्देश) आणि सुनील गजबीर (वय 22 वर्षे, कळंगुट, मूळ नेपाळ) या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दोघांवरही पर्वरी पोलीस स्टेशन मध्ये IPC 03/2024 U/s. 379 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Goa Theft Case
Arpora : डान्सबार, क्लब सारख्या गोष्टींना हडफडेत थारा नाही; कळंगुटमधील प्रकारावरही सरपंचांचे सडेतोड उत्तर, वाचा..

काही दिवसांपूर्वी पर्वरी पोलीस स्टेशनमध्ये GA-07-Y-7511 क्रमांकाची होंडा हॉर्मेट आणि KA-71-H-0711 क्रमांकाची हीरो डिलक्स दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलीस चोरट्यांच्या मागावर होते.

तपासादरम्यान पोलीस पथकाचे प्रमुख पी.एस.आय. मंदार परब यांच्या सोबत पोलीस कॉन्स्टेबल महादेव नाईक, उत्कर्ष देसाई, नितेश गावडे, योगेश शिंदे यांनी सापळा रचून या संशयितांना अटक केली.

पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी पर्वरी आणि इतर भागात मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी हिसका दाखवत आरोपींकडून चोरीच्या दोन मोटार सायकली जप्त केल्या.

या शिवाय त्यांच्याकडून आणखी दोन चोरीच्या मोटार सायकली आणि वेगवेगळ्या बनावटीचे 06 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत रु. 4,00,000/- (रु. चार लाख) असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com