BJP Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील मंत्री नेत्यांच्या तोफा कर्नाटकात धडाडणार, CM सावंत, राणे, लोबो यांच्यासह 'या' नेत्यांवर मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे निवडणुकीसाठी स्टार प्रचारक आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

देशभरात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून आगामी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने विशेष रणनीती आखायला सुरुवात केली आहे. यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षीय जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत. गोवा राज्यातील काही नेत्यांवर निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती प्राप्त होतेय.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे भाजपचे स्टार प्रचारक असणार आहेत तर आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हेही प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे निवडणुकीसाठी स्टार प्रचारक आहेत. सावंत यांच्यावर साखळी नगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रममध्येही लक्ष घालावे लागणार असल्याने कर्नाटकातील प्रचाराच्या तारखा आणि वेळही त्यांच्या सोयीनेच ठरविली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

विश्‍वजीत राणे यांच्यावर उत्तर कन्नड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 11 एप्रिल पासून ते मतदान होईपर्यंत स्थानिक नेतेमंडळींना सोबत घेऊन प्रचाराचे पूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी राणे यांच्यावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT