International Chess Tournament: नीतिशला इंदूर मेयर्स कप विजेतेपद

आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा ः शानदार कामगिरीसह एलो गुणांतही वाढ
Chess Tournament
Chess TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू नीतिश बेलुरकर याने इंदूर मेयर्स कप आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. मध्य प्रदेशमधील इंदूर येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने दहा फेऱ्यांत साडेआठ गुणांची कमाई केली. यशस्वी कामगिरीमुळे त्याच्या मानांकनातील एलो गुणांतही उल्लेखनीय भर पडली.

स्पर्धेत एकूण नऊ महासंघाचे 217 बुद्धिबळपटूंचा सहभाग होता. यामध्ये यजमान भारतासह अझरबैजान, जॉर्जिया, किर्गिझस्तान, पोलंड, उझबेकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, तसेच फिडे संलग्न खेळाडू सहभागी झाले होते. त्यात 16 ग्रँडमास्टर, 21 आयएम व सात वूमन इंटरनॅशनल मास्टर खेळाडूंचा समावेश होता.

24.3 एलो गुणांची कमाई

इंदूर मेयर्स कप स्पर्धेतील शानदार कामगिरीमुळे नीतिशने 2611 कामगिरी गुणांकनासह एकूण 24.3 एलो गुणांची कमाई केली. सध्या त्याचे 2436 इतके एलो गुण मानांकन आहे. जीनो फार्मास्युटिकल्सचा सदिच्छा दूत असलेला नीतिश कुजिरा येथील एस. एस. धेंपो महाविद्यालयात शिकतो.

इंदूरमधील स्पर्धेत त्याने बोरिस सावचेन्को व दीप सेनगुप्ता या ग्रँडमास्टर, ऋत्विज परब व हर्ष सुरेश या फिडे मास्टर खेळाडूंना हरविले. ग्रँडमास्टर दीपन चक्रवर्ती, आयएम अरोण्यक घोष, आयएम व्हिएनी डिकुन्हा आदी खेळाडूंना बरोबरीत रोखले. गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीने नीतिशचे विजेतेपदाबद्दल अभिनंदन केले आहे.

Chess Tournament
Goa Accident: दाबोळी जंक्शन येथे भीषण अपघात, ट्रकखाली चिरडून एक ठार

अन्य गोमंतकीयांचीही चमक

इंदूर मेयर्स कप बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी अन्य गोमंतकीय बुद्धिबळपटूंनीही चमक दाखविली. आयएम अमेय अवदी व फिडे मास्टर ऋत्विज परब यांनी प्रत्येकी सात गुणांची नोंद केली. त्यांना अनुक्रमे 11 व 13 वा क्रमांक मिळाला. मंदार लाड व एथन वाझ यांचे प्रत्येकी साडेपाच गुण झाले. त्यांना अनुक्रमे 80 व 82व्या क्रमांक प्राप्त झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com