Mauvin Godinho Gomantak Digital Team
गोवा

Bicholim News : लाटंबार्से औद्योगिक वसाहतीला लवकरच चालना - गुदिन्हो

रोजगार संधी : वीज ट्रान्सफॉर्मर कामाची उद्योग मंत्र्यांकडून पायाभरणी

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : लाटंबार्से औद्योगिक वसाहतीत उद्योगधंदे कार्यान्वित झाल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, ग्रामीण परिसराचा विकास होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या साधनसुविधा उपलब्ध करून या औद्योगिक वसाहतीला शक्य तितक्या लवकर चालना देण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत.

असे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. लाटंबार्से औद्योगिक वसाहतीत वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामाची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. लाटंबार्से औद्योगिक वसाहतीत 8 भुखंड असून, त्यातील 4 भूखंड देण्यात आले आहेत. प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार, असे गुदिन्हो म्हणाले.

औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि आयटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत गुदिन्हो यांनी श्रीफळ वाढवून या कामाची पायाभरणी केली.

आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक, वीज खात्याचे कार्यकारी अभियंते रामचंद्र मुद्रास, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, लाटंबार्सेची उपसरपंच त्रिशा राणे, रामा गावकर, विश्वास गावकर, अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. रामचंद्र मुद्रास यांनी आभार मानले.

वीज केंद्रासाठी जागा

लाटंबार्से औद्योगिक वसाहत लवकर सुरु व्हावी. त्यासाठी उद्योगमंत्री गुदिन्हो हे स्वतः आग्रही आहेत. या वसाहतीत आवश्यक साधनसुविधा उभारण्याचे काम सुरू असून, वीज उपकेंद्रही उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आयडीसीतर्फे वीज खात्याला ३ हजार चौरस मीटर जागा दिली आहे, अशी माहिती डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली. लाटंबार्से औद्योगिक वसाहतीला लवकर चालना मिळण्यासाठी आयडीसीकडून आवश्यक ते सहकार्य मिळणार असल्याची ग्वाही आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT