Dainik Gomantak
गोवा

Vasco News : विमानात ‘सिगारेट’ पेटविली; प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाली

Vasco News : हे विमान दाबोळी विमानतळावर मंगळवारी (ता.२३) रात्री उतरले होते. या प्रकाराबद्दल इंडिगोच्या साहाय्यक व्यवस्थापकांनी दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकामध्ये बुधवारी सकाळी तक्रार नोंदविली.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को, सिगारेट ओढण्याची लहर आल्याने एक प्रवासी वॉशरूममध्ये गेला. त्याने काडीपेटीने सिगारेट पेटविली आणि अलार्म वाजल्याने हवेतच असलेल्या विमानातील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली.

विमान दाबोळी विमानतळावर उतरल्यावर त्या प्रवाशाच्या विरोधात दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हैदराबादहून गोव्याकडे येणाऱ्या इंडिगो विमानातून आंध्र प्रदेशातील गड्डम श्रीनिवास (४०) हा प्रवास करीत होता. विमान हवेतच असताना त्याला सिगारेट ओढण्याची हुक्की आली. तो वॉशरूममध्ये गेला आणि त्याने आपल्याकडील काडीपेटीने सिगारेट पेटविली. त्यामुळे तयार झालेल्या धुरामुळे विमानातील फायर अलार्म वाजू लागला.

त्यानंतर घाबरलेल्या गड्डमने लगबगीने ती सिगारेट विमानातील शौचालयामध्ये टाकली आणि तो बाहेर पळाला. मात्र, धुरामुळे अलार्म वाजल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सर्वजण चिंताग्रस्त बनले. हे विमान दाबोळी विमानतळावर मंगळवारी (ता.२३) रात्री उतरले होते. या प्रकाराबद्दल इंडिगोच्या साहाय्यक व्यवस्थापकांनी दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकामध्ये बुधवारी सकाळी तक्रार नोंदविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT