Dainik Gomantak
गोवा

Indigo Flight: विमानप्रवाशानं अचानक उघडलं इमर्जन्सीचं दार, दाबोळीत 'अजब' प्रकार; गोवा-सुरत फ्लाईटमध्ये गोंधळ

Emergency Door Opened: गोवा-सुरत विमानात चढत असताना एका प्रवाशाने विमानाच्या इमर्जन्सी एक्झिटचा फ्लॅप कव्हर उघडलं

Akshata Chhatre

दाबोळी: गोव्यातील दाबोळी विमानतळावर शनिवारी (७ जून ) एक धक्कादायक घटना घडली. गोवा-सुरत विमानात चढत असताना एका प्रवाशाने विमानाच्या इमर्जन्सी एक्झिटचा फ्लॅप कव्हर उघडलं, ज्यामुळे तांत्रिक बिघाड झाला आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला. या गंभीर प्रकरणी दाबोळी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

इंडिगो एअरलाईन्सच्या इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या सहाय्यक व्यवस्थापक प्राजक्ता गावस यांनी या संदर्भात गुजरातच्या एका नागरिकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी, यामुळे काही काळ सुरक्षीची भीती निर्माण झाली होती. या कृतीमुळे विमानातील इतर प्रवाशांचे जीवन धोक्यात आले होते आणि सामान्य प्रक्रिया विस्कळीत झाली होती.

विमानाच्या इमर्जन्सी एक्झिटला हात लावणे किंवा उघडणे हे अत्यंत धोकादायक आणि नियमबाह्य कृत्य आहे.दाबोळी विमानतळ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अधिक तपास सुरू आहे.

प्रवाशांनी विमान नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन विमान कंपन्या आणि सुरक्षा यंत्रणांकडून नेहमीच केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

SCROLL FOR NEXT