
पणजी: गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. तसेच, हवाई वाहतुकीला देखील याचा फटका बसला आहे. मंगळवारी खराब हवामानामुळे दोन फ्लाईट वळविल्यानंतर आता इंडिगोच्या वतीने प्रवाशांसाठी मार्गशदर्श सूचना जारी केली आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे फ्लाईटला विलंब होण्याची किंवा रद्द केली जाऊ शकते असे इंडिगोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विमानतळावर येण्यापूर्वी फ्लाईट्चे स्टेट्स तपासून बाहेर पडावे जेणेकरुन हवामानामुळे काही बदल करण्यात आले असतील तर त्याची पूर्व कल्पना प्रवाशांना मिळेल.
इंडिगोच्या वतीने काय सूचना देण्यात आल्या आहेत?
- फ्लाईट्ची रिएल टाईम माहिती मिळविण्यासाठी इंडिगोच्या संकेतस्थळ किंवा कस्टमर सर्व्हिस सेंटर सोबत संपर्क साधावा
- पावसामुळे विमानतळाकडे येणाऱ्या मार्गावर काही अडथळा निर्माण झालाय का याची खातरजमा करा
- पाऊस आणि हवामानाच्या माहितीसाठी आयएमडी सारख्या अधिकृत संस्थेच्या माहितीवर विश्वास ठेवा
मुसळधार पावसाचा विमानसेवेला फटका
मुसळधार पावसाचा गोव्यातील विमानसेवेला फटका बसला असून, दाबोळीवर उतरणारी दोन विमाने एक बेळगाव येथे आणि दुसरे हैदराबाद येथे वळविण्यात आले. खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे विमानतळ संचालकाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
रेड अलर्ट
राज्यात हवामान खात्याच्या वतीने बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, २२ आणि २३ मे या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.