IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

IndiGo Airline: इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, यासाठी इंडिगो एटीआर, एम्ब्रेर आणि एअरबस या तीन विमान उत्पादक कंपन्यांशी चर्चा करत आहे.
Indigo Flight Update
Indigo Flight UpdateDainik Gomantak

IndiGo Future Plan: देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो आपल्या प्रादेशिक नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आपल्या ताफ्यात नवीन विमानांचा समावेश करण्याची योजना आखत आहे. इंडिगो 100 छोटी विमाने खरेदी करण्याच्या योजनेवर काम करत आहे. इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, यासाठी इंडिगो एटीआर, एम्ब्रेर आणि एअरबस या तीन विमान उत्पादक कंपन्यांशी चर्चा करत आहे. इंडिगोकडे आधीच 78 सीट असलेली 45 ATR-72 विमाने आहेत. यावर्षीही कंपनीला अशी आणखी 5 विमाने मिळणार आहेत.

इंडिगो फ्रँको-इटालियन कंपनी एटीआरसोबत हा करार अंतिम करु शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. विमान कंपनीसोबत हा करार निश्चित झाल्यास, इंडिगो ही जगातील सर्वात जास्त एटीआर विमाने चालवणारी कंपनी बनेल. सध्या हा विक्रम इंडोनेशियाच्या विंग्स एअरच्या नावावर आहे. विंग्स एअर 74 एटीआर विमाने चालवते. दुसरीकडे, एअरबसची A220 आणि Embraerची E-175 विमानेही या डीलच्या रेसमध्ये आहेत.

Indigo Flight Update
Indigo Airline Offer: आता फ्लाइट तिकिटांवर मिळणार एवढ्या हजारांची सूट, 'ही' खास ऑफर...

इंडिगो आधीच देशात 60 टक्के देशांतर्गत उड्डाणे चालवते. एअरलाइनने 30 मोठी एअरबस A350-900 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या खरेदीमुळे इंडिगो देश आणि विदेशात आपले नेटवर्क आणखी मजबूत करेल. एअरबससोबतच्या या करारानंतर इंडिगोही मोठी विमाने असलेल्या विमान कंपन्यांच्या श्रेणीत सामील झाली आहे. त्यामुळे त्याचा ताफा अधिक मजबूत झाला आहे. दुसरीकडे, भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी एव्हिएशन मार्केट आहे. प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एअरलाइन्स वेगाने आपला विस्तार करत आहेत.

Indigo Flight Update
Indigo Airline: एअर इंडियाचा रेकॉर्ड मोडून इंडिगोने इतिहास रचला, एअरबसला दिली 500 विमानांची ऑर्डर

यापूर्वी इंडिगोने सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील फ्यूल सरचार्ज काढून टाकण्याची घोषणा केली होती. एटीएफच्या किमतीत वाढ झाल्यानंतर इंडिगोने ऑक्टोबर 2023 पासून फ्यूल सरचार्ज लागू केला होता. या निर्णयानंतर इंडिगोकडून सांगण्यात आले की, एटीएफचे दर सतत बदलत राहतात. बाजारातील परिस्थितीनुसार भविष्यात भाड्यात बदल होऊ शकतो.

Indigo Flight Update
Pakistan International Airlines: दर वर्षी कोट्यवधींचं नुकसान, कर्ज फेडण्यासाठी कंगाल पाकिस्तान विकणार 'एअरलाइन्स'

फ्यूल सरचार्ज अंतर्गत, 500 किमी पेक्षा कमी प्रवासासाठी 300 रुपये, 510 ते 1000 किमी दरम्यानच्या प्रवासासाठी 400 रुपये, 1001 किमी ते 1500 किमी दरम्यानच्या प्रवासासाठी 550 रुपये आणि 1501 किमी ते 2500 किमी दरम्यानच्या प्रवासासाठी 2500 रुपये शुल्क आकारले जाते. 2501 ते 3500 किलोमीटरच्या प्रवासासाठी 650 रुपये, 2501 ते 3500 किलोमीटरच्या प्रवासासाठी 800 रुपये आणि त्याहून अधिक प्रवासासाठी 1000 रुपये सरचार्ज आकारला जात होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com