Indigo Flight From Goa to Lucknow Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: जिथून टेक ऑफ तिथेच 20 मिनिटात विमानाचं पुन्हा लँडिंग, पुढचे तीन तास प्रवाशांना मनस्ताप; गोवा विमानतळावर काय घडलं?

Indigo Flight From Goa to Lucknow: तांत्रिक बिघाडांमुळे गोवा ते लखनऊ प्रवास करणाऱ्या विमानाला मागे बोलवावं लागलं मात्र अडचण दूर झाल्यानंतर रात्री 9:15 वाजता विमानाने पुन्हा भरारी घेतली

Akshata Chhatre

दाबोळी: गोवा ते लखनऊ असा प्रवास करणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये मंगळवारी (दि. 19 नोव्हेंबर) रोजी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हे विमान पुन्हा विमानतळावर उतरवण्यात आले. घडलेल्या एकूण तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांचा बराच खोळंबा झाला, त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्याची माहिती देण्यात आली होती मात्र विमान कंपनीकडून असे काहीही पाऊल उचलले न गेल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

मंगळवारी संध्याकाळी 6:25 वाजता इंडिगो कंपनीच्या 6E, 6811 या विमानाने लखनऊसाठी उड्डाण केलं होतं, मात्र विमानाने भरारी घेतल्याघेतल्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि विमानाला पुन्हा मागे फिरावं लागलं. विमानामध्ये झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे केवळ 20 मिनिटांमध्ये विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरवण्यात आलं.

दरम्यान प्रवाशांना बॅग घेऊन खाली उतरण्यास सांगितलं होतं मात्र तासभर लोटून सुद्धा इंडिगोच्या प्रवाश्यांसाठी पर्यायी व्यवस्था गेली गेली नाही. बराच वेळ वाट बघितल्यानंतर प्रवाशांनी गोंधळ सुरु केला आणि हा गोंधळ आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली होती.

रात्री 9:15 वाजताच्या सुमारास विमानाची दुरुस्ती झाली असल्याचे सांगून प्रवाशांना पुन्हा बोर्डिंग करायला सांगितलं होतं. काही तांत्रिक बिघाडांमुळे गोवा ते लखनऊ प्रवास करणाऱ्या विमानाला मागे बोलवावं लागलं होतं मात्र ही अडचण दूर झाल्यानंतर विमानाने यशस्वी उड्डाण केल्याची माहिती विमानतळ संचालक एस. व्ही. टी. धनमंजन राव यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT