IndiGo Flights Status Dainik Gomantak
गोवा

Indigo Flight Status: असुविधा के लिए खेद है! इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच, गोव्यात 11 उड्डाणे रद्द, कंपनीने मागितली माफी

IndiGo flights cancelled: उड्डाणे रद्द केल्याची कंपनीकडून माहिती न मिळाल्याने तसेच पर्यायी प्रवासाची व्यवस्था न केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Pramod Yadav

पणजी: देशातील सर्वात मोठ्या इंडिगो कंपनीची विमानसेवा तिसऱ्या दिवशी देखील विस्कळीतच आहे. अपुरे मनुष्यबळ आणि वातावरणातील बदलामुळे वेळापत्रकात करण्यात आलेला बदल याचा जवळपास इंडिगोच्या ३०० उड्डाणांना फटका बसला. गोव्यात देखील दाबोळी विमानतळावरील ११ उड्डाणे रद्द करण्यात आली.

मुंबई, दिल्ली, गोवा, बंगळुरु यासारख्या अन्य विमानतळावरील ३०० उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवाशांना फटका बसला. यानंतर अखेर कंपनीने प्रवासी आणि भागधारकांची माफी मागितली आहे.

देशभरातून कंपनीच्या प्रवाशांना उड्डाणे रद्द झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. उड्डाणे रद्द केल्याची कंपनीकडून माहिती न मिळाल्याने तसेच पर्यायी प्रवासाची व्यवस्था न केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

“घडलेल्या प्रकारांमुळे त्रास सहन कराव्या लागणाऱ्या आमचे प्रवासी आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो. विमान उड्डाणांचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत”, असे कंपनीने एक्सवरुन प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

रद्द करण्यात आलेल्या फ्लाईट्स व वेळापत्रकातील बदल याबाबत प्रवाशांनी माहिती दिली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

फ्लाईट्सची माहिती मिळविण्यासाठी प्रवाशांना येथे क्लिक करता येईल.

इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्याने दिल्ली विमानतळावरील १५० फ्लाईट्सना फटका बसला. यात ७५ लँड होणाऱ्या आणि ७५ विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या.

दिल्लीसह मुंबईतून ८५, हैद्राबादमधून ७०, बंगळुरुमध्ये ५० तसेच गोव्यात ११ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. इंडिगो भारतातील एक सर्वात मोठी विमान कंपनी आहे. कंपनीकडे ४०० विमाने असून, दररोज २,३०० पेक्षा फ्लाईट्स ये-जा करतात. कंपनीच्या फ्लाईट्स देशांतर्गत ९० हून अधिक तर ४५ हून अधिक आंतरराष्ट्रीय ठिकाणांना विमानसेवा पुरवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्नाचे आश्वासन देऊन महिलेशी केली मैत्री, लैंगिक अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; वडिल, मुलाचा फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

Harbhajan Singh: "मोहम्मद शमी कुठेय?" टीम इंडियाच्या सिलेक्शनवर हरभजन सिंह संतापला; गंभीर-आगरकर यांच्यावर उठवली टीकेची झोड!

Dabolim Airport: दाबोळी विमानतळासाठी 255 कोटी! केंद्राकडून निधी मंजूर; विमानोड्डाणमंत्री रुडींनी दिली माहिती

मुलगा पसंत नाही! साखरपुड्यानंतर लग्नास नकार, बेळगावातील मुलीवर 25 लाख खर्च केलेल्या कोल्हापूरच्या तरुणाची थेट कोर्टात धाव

Karapur: ..हा अपघाती मृत्यू नाही, घातपाताचा प्रकार! कारापूर प्रकरणी निघणार 'मशाल मोर्चा'; काय आहे प्रकरण Watch Video

SCROLL FOR NEXT