Goa Tourism: इस्रायली पर्यटकांसाठी 'गोवा' सर्वाधिक लोकप्रिय! वाणिज्य दूत हॉफमन यांची स्तुतीसुमने; थेट विमानसेवेबाबत मंत्री खंवटेंशी चर्चा

India Israel tourism: हॉफमन म्हणाल्या की, गोवा–तेल अवीव थेट हवाईसेवा उपलब्ध झाली तर ते दोन्ही बाजूंकरता खऱ्या अर्थाने गेम-चेंजर ठरेल. २०-३० हजार इस्रायली भारतात येतात.
Goa Tel Aviv direct flight
Goa Tel Aviv direct flightDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा आणि तेल अवीव यांच्यातील थेट विमानसेवा सुरू झाल्यास भारत–इस्रायल पर्यटन आणि व्यावसायिक देवाणघेवाणीत मोठी क्रांती घडेल, असे इस्रायलच्या भारतातील पर्यटनविषयक वाणिज्य दूत गॅलिट हॉफमन यांनी सांगितले.

सध्या भारतात दरवर्षी २० ते ३० हजार इस्रायली पर्यटक येतात. थेट उड्डाण उपलब्ध झाल्यास हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, तसेच गोव्यातून इस्रायलला जाणाऱ्या कुटुंबे आणि व्यावसायिकांचाही प्रवास सुलभ होईल, असे हॉफमन यांनी स्पष्ट केले.

हॉफमन म्हणाल्या की, गोवा–तेल अवीव थेट हवाईसेवा उपलब्ध झाली तर ते दोन्ही बाजूंकरता खऱ्या अर्थाने गेम-चेंजर ठरेल. २०-३० हजार इस्रायली भारतात येतात; परंतु थेट उड्डाण मिळाल्यास कुटुंबे, व्यावसायिक आणि अनेक नवीन प्रवासी विभाग यात सहभागी होतील.

भारतामधील इस्रायली पर्यटकांसाठी गोवा सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताला भेट देणारे बहुतेक इस्रायली गोव्यात आवर्जून येतात. गोवाची इस्रायलमध्ये उत्तम प्रतिमा आहे आणि परस्पर पर्यटनाला प्रचंड वाव आहे, असे त्यांनी सांगितले.

Goa Tel Aviv direct flight
Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

तसेच गोव्यातून इस्रायलसाठीही पर्यटनाची मोठी क्षमता असून दोन्ही देशांमध्ये या मार्गावर सातत्याने वाढणारा प्रवाह दिसू शकतो, असे त्या म्हणाल्या.

हॉफमन यांनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्याबत झालेल्या चर्चेत थेट हवाईसेवेचा मुद्दा अग्रक्रमावर असल्याचे सांगितले. आमची बैठक अत्यंत सकारात्मक झाली. थेट गोवा–तेल अवीव उड्डाण हीच मुख्य चर्चा होती. अशी सेवा सुरू झाली तर पर्यटनाचा संपूर्ण नकाशाच बदलेल, असे त्यांनी स्पष्ट केले. थेट उड्डाणास अवघे साडेपाच तास लागतील आणि त्यामुळे दोन्ही देशांतील संपर्क अधिक सुदृढ होईल, असे त्यांनी नमूद केले.

Goa Tel Aviv direct flight
Goa Tourism: गोव्याच्या दगडांवर लपलंय मोक्सी रॉक आर्ट; 'या' गावात दिसतात निओलिथिक युगाचे पुरावे

इस्रायली विमान कंपन्यांचीही उत्सुकता

हॉफमन यांनी सांगितले की, इस्रायलमधील काही विमान कंपन्यांनी भारतात, विशेषतः गोव्यात थेट सेवा सुरू करण्याविषयी स्पष्ट रस दाखवला आहे. इस्रायलने गेल्या वर्षी सुरू केलेल्या सुधारित व्हिसा प्रक्रियेमुळे भारतीय पर्यटकांचा इस्रायल दौरा वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com