Flights To Goa Dainik Gomantak
गोवा

Flights To Goa: आणखी एका राज्यातून थेट गोव्याला विमानसेवा सुरू, मोपावर उतणार विमान

गोव्यात दाबोळीनंतर आता मोपा येथे देखील विमानतळ कार्यान्वित झाले आहे. यामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

Pramod Yadav

Flights From Patna To Goa: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. अनेकजण सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मसुरी, मनालीसह हिल स्टेशनवर जात आहेत. याशिवाय अनेकांचा गोव्यासारख्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन असतो. गोव्याला येण्यासाठी देशातील अनेक राज्यातून थेट विमानसेवा सुरू झाली आहे.

गोव्यात दाबोळीनंतर आता मोपा येथे देखील विमानतळ कार्यान्वित झाले आहे. यामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दरम्यान, आता आणखी एका राज्यातून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

बिहारची राजधानी पाटण्याहून गोव्याला जाण्यासाठी आता थेट विमानसेवा (Patna to Goa Flight) सुरू करण्यात आली आहे.

पाटणा येथील जय प्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ ते उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर थेट विमानसेवा पुरवली जाणार आहे. इंडिगो कंपनीच्या मार्फत पाटणा ते गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

इंडिगो एअरलाइन्समार्फत 22 मेपासून पाटणा ते गोवा थेट विमानसेवा सुरू करणार आहे. याशिवाय 30 मेपासून पाटणा ते दुर्गापूर अशी नवी विमानसेवा सुरू होणार आहे.

यासाठी इंडिगो एअरलाइन्सला (Indigo Airlines) डीजीसीएकडून देखील परवानगी आणि स्लॉट मिळाली आहे. इंडिगोने 22 मे पासून पाटणा ते उत्तर गोव्यासाठी 6E 6931 आणि 6E 6932 उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक 6E 6931 सोमवार, शुक्रवार आणि रविवार तसेच बुधवारी उत्तर गोव्याहून पाटण्याकडे उड्डाण करेल. सोमवार, शुक्रवार आणि रविवारी हे विमान मोपा विमानतळ (उत्तर गोवा) येथून 14:10 वाजता उड्डाण करेल आणि 16:45 वाजता पाटणा येथे उतरेल.

पाटणा विमानतळावरून, या तीन दिवसांत 6E 6932 फ्लाइट 17:20 वाजता उत्तर गोव्याकडे उड्डाण करेल आणि मोपा विमानतळावर 19:55 वाजता पोहोचेल.

याशिवाय हे उड्डाण मोपा विमानतळ (उत्तर गोवा) येथून बुधवारी सकाळी 9:35 वाजता उड्डाण करेल आणि  12:20 वाजता पाटणा येथे पोहोचेल आणि 16:30 वाजता पाटणा येथून परतीच्या विमानाने 19:05 वाजता मोपा विमानतळावर पोहोचेल.

ही विमानसेवा बुधवार 24 मे पासून सुरू होणार आहे. या प्रवासाला सुमारे 2 तास 35 मिनिटे लागतील आणि भाडे सुमारे 5,600 रुपये असेल.

गोवा शिवाय व्यतिरिक्त, इंडिगो फ्लाइट 6E 305 पाटणा ते दुर्गापूर (Patna to Durgapur Flight) मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 14:15 वाजता उड्डाण करेल आणि 15:30 वाजता दुर्गापूरला पोहोचेल. त्याच दिवशी 16:00 वाजता दुर्गापूरहून हे विमान पाटणाला उड्डाण करेल आणि 17:25 वाजता पाटणा विमानतळावर उतरेल.

हा प्रवास 1 तास 15 मिनिटांचा असेल. यासाठी सुमारे 2,700 रुपये मोजावे लागणार आहेत. ही सेवा 30 मे पासून सुरू होत असून, ती दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उपलब्ध असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वडिलांनी फोन काढून घेतला, मुलाचा संताप अनावर; मोबाईलच्या वेडापायी उचललं 'चुकीचं पाऊल'

आईचा आदर न करणारा व्यक्ती भारतमातेचा काय आदर करणार? राहुल गांधी आई सोनिया गांधींवर ओरडायचे; विश्वजीत राणेंनी सांगितला किस्सा

फिश मिल प्लांटला कुंकळ्ळी पालिकेचा नकार, सरकारने दुर्लक्ष केल्यास थेट आंदोलनाचा इशारा; LoP युरी

Nepal PM Resigned: केपी शर्मा ओली यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, Gen-Z च्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये सत्तांतर

Marcus Stoinis Engagement: मार्कस स्टॉइनिस साराच्या प्रेमात, भर समुद्रात दोघांनी एकमेकांना केलं प्रपोज, पाहा रोमँटिक PHOTOS

SCROLL FOR NEXT