गोवा

Vasco New: भारतीय तटरक्षक गोवा प्रदेशने अनेक घरांवर फडकवला तिरंगा

वाडे नगर इंग्लिश हायस्कूल -नवे वाडे मुरगांव तर्फे" हर घर तिरंगा "जनजागृती फेरी संपन्न.

गोमन्तक डिजिटल टीम

आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय तटरक्षक गोवा प्रदेशाने शनिवारी वास्कोतील नवेवाडे येथील मुरगाव नगरपरिषदेच्या प्रभाग-22 मध्ये अनेक घरांवर भारतीय ध्वज (तिरंगा) फडकवला. मुरगाव नगरपरिषदेचे प्रभाग 22 चे नगरसेवक सुदेश भोसले, सरकारी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनाली पेडणेकर, सारिका नाईक, कमांडंट भारतीय तटरक्षक जगदीश राज आणि इतर अधिकारी आणि आयसीजी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घरांवर तिरंगा फडकविण्यात आला. उपमहानिरीक्षक (डीआयजी) भारतीय तटरक्षक दल, गोवा क्षेत्र अर्णभ बोस (टीएम) आणि डीआयजी दिपू सी आर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन फेरी काढली.

वाडे नगर इंग्लिश हायस्कूल -नवे वाडे मुरगांव तर्फे" हर घर तिरंगा "जनजागृती फेरी संपन्न.

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त वाडेनगर इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नवेवाडे परिसरात चालत 'हर घर तिरंगा 'जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी 'भारत माता की जय', ' वंदे मातरम' ह्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. नगरसेवक सुदेश भोसले यांच्या हस्ते जनजागृती फेरीस झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आले. त्यांच्यासोबत मुख्याध्यापिका उमा देसाई व शिक्षक नितीन फळदेसाई अन्य शिक्षक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शेवटी सांगता करत असताना नगरसेवक सुदेश भोसले यांनी अमृत महोत्सवी वर्षाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच मुख्याध्यापिका यांनीही आपले विचार मांडले .स्वागत व आभार शिक्षक नितीन फळ देसाई यांनी केले.

दरम्यान आजादी का अमृत अमृता महोत्सवाचा एक भाग म्हणून वाडेनगर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तर्फे प्रभात फेरी काढण्यात आली. वाडेनगर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनघा देशपांडे आर्लेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या फेरीचे उद्घाटन प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक सुदेश भोसले यांच्या हस्ते हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.

या मिरवणुकीत एनसीसी कॅडेट्स आणि एनएसएस स्वयंसेवकासह सुमारे 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केली. मिरवणुकीत 'भारत माता की जय, वंदे मातरम्' अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी प्रणिता गावकर, वृंदा खांडोळकर, रेश्मा नायर, सुवर्णा बांदेकर, पूजा गावकर, परेश वेळीप, परेश वेरेकर, सविता डेगवेकर, दिलशा वालसन, अनिता फर्नांडीस, रोशन फर्नांडिस, प्रतिमा जंगली, झीनत परवीन, अश्विनी कवळेकर तसेच पुंडलिक दुन्ना, शांताराम सोनगुर्डेकर, कृष्णा नाईक आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT