Tiranga Rally : डिचोलीत 'तिरंगा रॅली'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार, नगरसेवकांसह सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग
Tiranga Rally in Bicholim
Tiranga Rally in BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : 'वंदे मातरम्, 'भारत माता की जय' असा जयघोष करीत शनिवारी (ता. 13) मोठ्या उत्साहात 'तिरंगा रॅली' काढण्यात आली. 'आझादी का अमृत महोत्सव'निमित्त उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने डिचोली पालिकेने 'हर घर तिरंगा' संकल्पनेंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

(Tiranga Rally in Bicholim)

Tiranga Rally in Bicholim
Goa Panchayat : सावर्डे पंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

डिचोलीचे आमदार डॉ. शेट्ये यांच्या उपस्थितीत येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरुन या रॅलीला सुरवात झाली. या रॅलीत उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, संयुक्त मामलेदार श्रीपाद माजीक, नगराध्यक्ष कुंदन फळारी अन्य नगरसेवक यांच्यासह सरकारी कर्मचारी, शिक्षक आदी देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाजारमार्गे बसस्थानकाकडून बगलमार्गावरून बोर्डे आदी शहरातील भागात रॅली काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रॅलीची सांगता झाली.

राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळेच आज आम्ही स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. असे आमदार डॉ. शेट्ये यांनी सांगितले. स्वातंत्र्याची शताब्दी मोठ्या धुमधडाक्यात साजरी व्हावी. यासाठी आजच्या मुलांमध्ये आतापासूनच राष्ट्रप्रेम निर्माण करावे, असे आवाहन यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com