भाजपने अगोदर 'आरएसएस'च्या शाखांवर तिरंगा फडकावून दाखवावा; काँग्रेसचे आव्हान

भाजपने हर घर तिरंगा मोहिमेच्या नावाखाली तिरंग्याचा बाजार केला असून, 14 रुपयांचा तिरंगा 25 रुपयांनी खरेदी केला.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: भाजपने हर घर तिरंगा मोहिमेच्या नावाखाली तिरंग्याचा बाजार केला असून, 14 रुपयांचा तिरंगा 25 रुपयांनी खरेदी केला. भाजप नेत्यांनी सर्वत्र तिरंग्याचा अपमान सुरू केला आहे. भाजपने अगोदर 'आरएसएस'च्या शाखांवर तिरंगा फडकावून दाखवावा असे आव्हान गोवा काँग्रेसने केले आहे.

(BJP should first hoist tricolor on 'RSS' branches; Congress challenge)

Goa Congress
...तर त्यांना भाजप कार्यालयातून मिळणार मोफत तिरंगा

सरकारने मागविलेले राष्ट्रध्वज खराब झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगणे अत्यंत दुर्दैवी आहे. राष्ट्रीय अभिमानाप्रती भाजप सरकारचे अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तन या अनुषंगाने दिसून येते. आता राष्ट्रध्वजाचाही भाजपने व्यवसाय केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते कॅ. व्हिरिएतो फर्नांडिस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला होता.

राज्य सरकारला मिळालेल्या सुमारे अडीच लाख राष्ट्रध्वजांचे नुकसान झाल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कबुलीचा कॅ. फर्नांडिस यांनी समाचार घेतला आहे. या सरकारला खाद्यपदार्थ, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांची किंमत कळत नाही. राष्ट्रीय दिवसांचे उत्सव साजरे करून पैसे कमविण्याचे त्यांना वेड लागले आहे. या प्रकारातून त्यांनी स्वातंत्र्य दिनालाही सोडले नाही.

तिरंगा ध्वज खरेदीवर झालेल्या खर्चाबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे. बाजारभावाच्या तुलनेत झेंडे अत्यंत दुप्पट दराने खरेदी केल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर होर्डिंग्जवर तिरंगा प्रदर्शित करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज तात्काळ हटवावीत, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com