Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

स्वातंत्र्यदिनी भेट: गोमंतकीयांना पाणी मिळणार मोफत

राज्यातील नागरिकांना अत्यल्प दरात (काही युनिट मोफत) पाणी देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) निवडणुकीचे (Election) पडघम वाजू लागले आहेत. विविध पक्षांकडून आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. त्यातच ‘जनसंपर्क यात्रे’ वर असलेल्या भाजप (BJP) सरकारनेही (Government) गोमंतकीयांची मने जिंकण्यासाठी ‘रात्रीचा दिवस’ करण्याचे ठरविले आहे. राज्यातील नागरिकांना अत्यल्प दरात (काही युनिट मोफत) पाणी देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडला आहे. त्याची अधिकृत घोषणा आज स्वातंत्र्यदिनी करण्यात येईल. ही योजना नागरिकांसाठी एक ‘भेट’ ठरणार आहे. (Independence Day gift: Decision of Chief Minister to provide water to citizens of Goa at very low rate)

विधानसभा निवडणुकीला सहा महिने शिल्लक असताना सत्ताधारी पक्षाने जाहीर प्रचाराला सुरुवात केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्यांनी शनिवारी साळगाव मतदारसंघातून सुरुवात केली.

मुख्यमंत्र्यापुढे समस्या

सांगोल्डा, नेरूल, वेरे बेती, रेईस मागूश, गिरी, पिळर्ण आणि साळगाव या सातही गावांतील प्रश्न, समस्या, योजना याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यांनी पिळर्ण पंचायतीमध्ये या स्वयंपूर्ण गोवा योजनेच्या ‘स्वयंपूर्ण मित्र’ आणि ‘स्वयंपूर्ण सहाय्यकांची’ प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी स्वयंमित्रांनी मुख्यमंत्र्यांपुढे समस्या मांडल्या.

आता ‘बाजार डॉट कॉम’ वर विका

स्वयंसाहायत्ता गटांनी बनवलेले साहित्य हे आता ‘बाजार डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून विकता येणार आहे. महिलांनाही ऑनलाईन विक्रीचा अनुभव येईल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवता येईल.

आपत्कालीन निवारा केंद्र

पिळर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये जलसंपदा खात्यातर्फे उभारण्यात येत असलेल्या आपत्कालीन निवारा केंद्राला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. राज्यात अजून सहा केंद्र उभारले जातील, अशी माहिती त्यांनी ‘गोमन्तक’ ला दिली.

योजना आमचीच : आप

राज्य सरकारच्या नियोजित मोफत पाणी वाटपावर ‘आप’ ने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ही योजना आम्ही 7 महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. त्याच योजनेचा पाठलाग सरकार करीत आहे. सरकार जनतेला आमिष दाखविण्याचे काम करीत आहे, असे वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Crime: 2 महिला, एका बालिकेची निर्घृण हत्‍या! एक मृत्‍यू संशयास्‍पद; महिलांसोबतच्या वाढत्या घटनांनी डिचोली हादरले

Fishermen Pele: 'चर्चवरील हल्ल्याने मन व्यथित झाले'! मच्छीमार पेलेने व्यक्त केली खंत; दोषींवर कारवाईची केली मागणी

पर्यटकांसाठी महत्वाची अपडेट! गोव्यातून परतीचा प्रवास महागला; तिकीटदर दुपटीपेक्षा जास्त; वाढीव रकमेमुळे कोलमडले बजेट

Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपतींनी मुर्मूंनी केला ‘वाघशीर’मधून प्रवास! ‘INS हंसा’ तळावर भव्य स्वागत; स्पेक्ट्रमची केली पाहणी

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2025 मध्ये गोव्यात घडलेल्या तीन घटना

SCROLL FOR NEXT