Goa: गोवेकारांच्या आधारामुळेच सर्व आव्हानांना तोंड देण्यास सज्ज

गोव्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्यामुळे महिला असुरक्षित (Goa)
GFP President & MLA Vijay Sardessai (Goa)
GFP President & MLA Vijay Sardessai (Goa)Dainik Gomantak

Margao: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या (India's 75th Independence Day) पूर्वसंध्येस गोवेकारांशी संवाद साधताना गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Goa Forward President Vijay Sardessai) यांनी गोवेकारांविषयी पूर्ण विश्वास व्यक्त करताना येणारी आव्हाने पेलण्याची ताकद गोवेकारांमध्ये असल्याचे म्हटले आहे. सैन्यदल, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर तत्काळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याप्रती त्यांनी आदर व्यक्त करताना या सर्वांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. गोवा या सर्वांच्या सदैव ऋणात राहील असे त्यांनी म्हटले. गोव्याने आपली स्वतंत्र ओळख आणि संस्कृती (Goa's Own Identity & Culture) राखूनही भारताच्या प्रगतीत आपले खास योगदान दिले आहे, याचा उल्लेख करत गोवेकार म्हणून आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. (Goa)

GFP President & MLA Vijay Sardessai (Goa)
Goa Dengue: वास्को शहर व परिसरात डेंग्यू रुग्ण वाढताहेत

या उत्कर्षात गोव्याबाहेर जे गोवेकर आहेत त्यांचेही तेवढेच योगदान आहे. गोव्याचे कल्याण व्हावे यासाठी तेही वावरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर बोलताना या महामारीने गोवेकारांसमोर आव्हाने उभी केली आहेत असे म्हणत, गोवेकरानी एकजुटीने या आव्हानांचा सामना केला. सर्वांनी एकमेकांना धीर देत या आव्हानाला तोंड दिले या बद्दल त्यानी गोवेकरांचे कौतुक केले. यातून आमची एकजुट दिसून आली असे त्यांनी म्हटले . यावेळी बोलताना सरदेसाई यांनी गोव्याला सतावणाऱ्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. मोले जंगलतोड, म्हादई प्रश्न, कोळसा प्रदूषण, बेरोजगारी अशा अनेक समस्यांचा उल्लेख करते वेळी सरकारी अनास्था, लोकशाहीचा खून अशा गोष्टींनाही सामोरे जावे लागले असे त्यांनी म्हटले.

GFP President & MLA Vijay Sardessai (Goa)
Goa: पेडणे पोलिसांनी चोराला केरळ मधून पकडले

गोव्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली (Law and order collapsed) असून गोव्यात महिला सुरक्षित नसल्याचे (Women Insecure in Goa) दिसून आले आहे. गोव्यात बेरोजगारी वाढल्याने लोक आर्थिक संकटात (Economic crisis) सापडले आहेत. गोव्यातील साधनसुविधा कोलमडून पडल्या आहेत. मात्र सरकारने या सर्वांकडे दुर्लक्ष करत गोवा विक्रीवर काढला असल्याचा आरोप त्यांनी केला. या अशा असंवेदनशील सरकारला पाडणे हे आता गोवेकारांसमोर असलेले मोठे आव्हान आहे. असे म्हणत तरुण पिढीचे भविष्य सुदृढ करण्यासाठी आता गोवेकारांचे सरकार येण्याची गरज व्यक्त करताना गोवेकर हा बदल घडवून आणू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com