Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: लाच घेण्याच्या घटनांत पोलिसांचा वाढता सहभाग

यंदा पोलिसांच्‍या लाच प्रकरणातील ठळक घटना म्‍हणून पोलिस शिपाई विकास कौशिक याच्‍या कारनाम्‍याकडे पाहावे लागेल.

दैनिक गोमन्तक

Goa Police: यंदा पोलिसांच्‍या लाच प्रकरणातील ठळक घटना म्‍हणून पोलिस शिपाई विकास कौशिक याच्‍या कारनाम्‍याकडे पाहावे लागेल. एका चोराने आपल्‍याला याच पोलिस शिपायाने चोरी करण्‍यास सांगितले होते, अशी कबुली पोलिसांकडे दिल्‍याने पोलिस सेवेतून कौशिकचे निलंबन करण्‍यात आले.

लाच घेतल्‍यामुळे निलंबित होण्‍याच्‍या अन्‍य तीन घटना असून सध्‍या निलंबित झालेले पोलिस निरीक्षक चव्‍हाण यांच्‍यावरही ‘आप’चे संदेश तेलेकर यांनी लाचखोरीचा आरोप केला होता. अन्‍य दोन घटनांत पोलिस शिपायांना लाच घेतल्‍याच्‍या प्रकरणात निलंबित करण्‍यात आले होते.

फेब्रुवारीच्‍या दरम्‍यान दक्षिण गोव्‍यातील एका कॅसिनो चालकाने अतिरेकीविराेधी पथकातील एका अधिकाऱ्याने आपल्‍याकडे पाच लाख रुपये मागितल्‍याची तोंडी तक्रार केली होती. मात्र, त्‍याने लेखी तक्रार करण्‍यास नकार दिल्‍यामुळे या प्रकरणावर शेवटी पडदा पडला.

निलंबितांच्‍या यादीत दाेन डाॅक्‍टर, शिक्षक

1 औषधांच्‍या बिलाच्‍या रकमेचा घोटाळा केल्‍यामुळे ईएसआयच्‍या एका डॉक्‍टराला निलंबित करून त्‍याची चौकशी सुरू केली होती. तर सरकारी डॉक्‍टर असतानाही रुग्‍णांकडून वैद्यकीय सेवा देण्‍यासाठी पैसे उकळण्‍याचा आरोप असलेल्‍या फोंडा आयडी इस्‍पितळातील एका डॉक्‍टराला निलंबित करण्‍यात आले होते.

2 आपल्‍या मुलाला फायदा व्‍हावा यासाठी संपूर्ण परीक्षा पद्धतच बदलणारे कारे कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्‍वा यांना निलंबित करण्‍यात आले तर शाळेच्‍या विद्यार्थिनींचा विनयभंग करण्‍याचा आरोप असलेला पीटी शिक्षक रमेश गावकर याला या प्रकरणात अटक झाल्‍यानंतर त्‍यालाही सेवेतून निलंबित करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT