Goa Unsafe Buildings: नौदलाच्या असुरक्षित इमारती रडारवर

मांगोरहील-वरुणापुरी येथे नौदलाच्या मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसच्या सुमारे 50 वर्षांपूर्वीच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने, या इमारतीखाली काम करणारा एक कामगार ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.
Vulnerable Navy Buildings
Vulnerable Navy BuildingsDainik Gomantak

Vulnerable Navy Buildings: मांगोरहील-वरुणापुरी येथे नौदलाच्या मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसच्या सुमारे 50 वर्षांपूर्वीच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने, या इमारतीखाली काम करणारा एक कामगार ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.

Vulnerable Navy Buildings
Goa Monsoon Update: राज्यात पाऊस पोहोचला 110 इंचांवर

या घटनेनंतर नौदलाच्या भोंगळ कारभाराचा पाढाच मुरगावच्या मुख्याधिकाऱ्यांनी वाचला. नौदलाच्या आणखी किती इमारती असुरक्षित आहेत, याची चौकशी पालिका करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरुणापुरी येथील मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसमधील त्या असुरक्षित घोषित केलेल्या नौदलाच्या एअर क्राफ्ट इमारतीला पालिकेचा कोणत्याच प्रकारचा परवाना नसतानाही नौदलाकडून त्या इमारतीत कामकाज चालू होते. त्यात नाहक एकाचा बळी गेला व दोघे गंभीर जखमी झाले.

ही इमारत जीर्णावस्थेत असतानाही नौदलाने ती पाडण्याची तसदी घेतली नाही. तसेच नौदलाने या इमारतीला कोणत्याच प्रकारचा पालिकेकडून परवाना घेतला नसल्याचे मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी यांनी सांगितले. तसेच नौदलाकडून इतर इमारतींचीही पालिकेत घरपट्टी भरत नसल्याचे सांगण्यात आले. याव्यातिरीक्त नौदल कचरा शुल्कही पालिकेला देत नाही.

Vulnerable Navy Buildings
Goa Monsoon Update: राज्यात पाऊस पोहोचला 110 इंचांवर

वरिष्ठांच्या डोळ्यांत धूळफेक: वर्षातून एकदा नौदलाचे वरिष्ठ अधिकारी नौदल परिसरात फेरफटका मारून पाहणी करून आढावा घेतात. यापूर्वी प्रत्येक क्षेत्र साफसफाई करून रंगकाम करून घेतले जाते. तसेच जीर्ण झालेल्या इमारतींना रंग फासून नवीन इमारत आहे, अशी भासवली जाते. मात्र, या इमारतींच्या देखभालीकडे नंतर दुर्लक्ष केले जाते.

मुख्याधिकारी तारी म्हणाले,

1 केंद्र सरकारच्या नियमानुसार राज्य सरकारच्या पंचायत किंवा पालिकेला केंद्रीय आस्थापनातर्फे १/३ शुल्क दिले जाते; परंतु वास्को येथील नौदल मात्र एक साधा पैसाही मुरगाव पालिकेला देत नाही.

2 वरुणापुरी येथील नौदलाच्या आणखीन किती इमारती असुरक्षित आहेत, त्यांची माहिती नौदलाने पालिकेला देणे आवश्यक आहे. याविषयी लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com