Goa Congress: भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध अहिंसक लढा दिला. महात्मा गांधी आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वामुळे आपला देश एकसंध राहिला. आज पुन्हा फूट पडत आहे. लोक द्वेष आणि हिंसाचाराची भाषा बोलत आहेत. धर्माचा वेश वापरून काही लोक हिंसाचाराला चिथावणी देत आहेत आणि लोकांना ठार मारण्याच्या घटना घडत आहेत. हे खूप वाईट आहे. भाजप (BJP) महात्मा गांधीजींच्या (Mahatma Gandhi) नावाचा वापर केवळ स्वत:च्या प्रचारासाठी करते, परंतु त्यांची धोरणे आणि कार्यक्रम त्यांच्या तत्त्वांच्या विरोधात आहेत, असा आरोप काॅंग्रेसचे नेते दिनेश गुंडू राव यांनी केला.
गोवा प्रदेश काँग्रेस (Goa Congress) समितीतर्फे महात्मा गांधीजींची 74वा पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर ते बोलत होते.
पुण्यतिथी कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, पक्षाच्या मीडिया प्रभारी अलका लांबा, उपाध्यक्ष एम के शेख, माजी उपसभापती शंभूभाऊ बांदेकर, सुनील कवठणकर, विठू मोरजकर, हिमांशू तिवरेकर, नौशाद चौधरी आदी उपस्थित होते. उपस्थितांनी गांधीजींना आदरांजली वाहिली.
नथुराम गोडसे यांनी त्यांची हत्या केली होती. भाजपने नेहमी महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर फक्त स्वतःच्या वापरासाठी केला. त्यांची तत्वे व मूल्ये यांचा विचार केला नाही अशी टीका काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केली.
अलका लांबा म्हणाल्या की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही सन्माननीय पदवी दिली, मात्र मोदी सरकार त्यांचा अनादर करते. भाजप सरकारने दिल्लीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले, मात्र जेव्हा ते महात्मा गांधीजींचा अनादर करतात तेव्हा मला वाटते की हा नेताजींचाही अनादर आहे. काँग्रेस महात्मा गांधींच्या तत्त्वांनुसार पुढे जाईल आणि देशासमोर असलेल्या सर्व समस्यांवर मात करेल, असे अलका लांबा म्हणाल्या.
गांधीजींना बदनाम करण्याचा आरएसएस’चा प्रयत्न
चोडणकर (Girish Chodankar) म्हणाले, महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा जगाला धक्का बसला होता. हा देशातील पहिला दहशतवादी हल्ला होता. ‘आरएसएस’च्या द्वेषपूर्ण विचारसरणीने नथुराम गोडसे याला दहशतवादी बनण्यास आणि महात्मा गांधींना मारण्यास भाग पाडले. बापूजी अजून जिवंत आहेत. आरएसएस त्यांचे विचार आणि तत्त्वे मारू शकले नाहीत. आरएसएस महात्मा गांधीजींची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यात ते यशस्वी होणार नाहीत, असे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.