Goa CM Pramod Sawant And MLA Krishna Daji Salkar Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचा इतिहास गोव्यातील शालेय पुस्तकात समाविष्ट करा; वास्कोच्या आमदाराची मागणी

Goa Assembly Budget Session: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहासाच्या पुस्तकात समावेश करण्याची मागणी साळकरांनी केली.

Pramod Yadav

पर्वरी: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास गोव्यातील शालेय पुस्तकात समाविष्ट करा, अशी मागणी वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दुवशी शून्य प्रहरात बोलताना आमदार साळकर यांनी ही मागणी केली.

गोव्यातील शालेय पाठ्य पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास समाविष्ट करावा, अशी मागणी आमदार साळकर यांनी केली. आमच्यावर अत्याचार करणाऱ्याच्यावर वीस पाने इतिहासात देण्यात आली आहेत. पण, स्वराज्यासाठी झगडणाऱ्यांबाबत केवळ तीन पाने देण्यात आली आहेत. याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करुन प्रामुख्याने शिवाजी आणि संभाजी महाराजांचा इतिहास समाविष्ट करावा, असे साळकर म्हणाले.

गोव्यातील शालेय पाठ्य पुस्तकात देण्यात आलेला इतिहास एकतर्फी असून, त्यात स्वराज्यासाठी लढणाऱ्या शूरविरांचा देखील समावेश करण्यात यावा. आहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप यासह मराठ्यांचा इतिहास मुलांना शिकवला जावा, असे साळकर म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहासाच्या पुस्तकात समावेश करण्याची मागणी साळकरांनी केली.

दरम्यान, याबाबत बोलताना मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री प्रमोद सावंत यांनी नव्याने आलेल्या नववीच्या पुस्तकात याचा समावेश केल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसांत ही पुस्तके प्रकाशित होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. विजय सरदेसाईंनी मात्र संधी साधत तो इतिहास इतिहासकारांनी भरावा, अशी टीपण्णी केली. यावर मी नाही इतिहासकारांनीच पाठ्य पुस्तकातील इतिहास लिहल्याचे सांवत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT