Saptakoteshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Saptakoteshwar Temple : नार्वेच्या सप्तकोटेश्वर मंदिराचे अभूतपूर्व उत्साहात लोकार्पण

मुख्यमंत्र्यांसह पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांकडून अभिषेक

गोमन्तक डिजिटल टीम

Saptakoteshwar Temple : ढोलताशांचा निनाद आणि विविध धार्मिक विधींसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नार्वे-डिचोली येथील सप्तकोटेश्वर मंदिराचे अभूतपूर्व उत्साहात आज शनिवारी लोकार्पण करण्यात आले.

मंदिरासह समोरील पवित्र तळीचेही लोकार्पण करण्यात आले. या आनंददायी सोहळ्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी गोव्यासह शेजारच्‍या राज्‍यांतून भक्तांचा महापूर लोटला होता. पुरातत्व खाते आणि देवस्थान समितीच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी अभिषेक करून श्री सप्तकोटेश्वर चरणी आपली सेवा अर्पण केली. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते.

नंतर गोवा आणि महाराष्ट्रातील विविध किल्ले आणि पवित्र स्थानांवरील जलाने जलाभिषेक सोहळा पार पडला. लोकार्पण सोहळ्यानिमित्त गेल्या गुरुवारपासून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. आज लोकार्पण सोहळ्यावेळी श्री सप्तकोटेश्वर मंदिर परिसरातील मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात अधिकच भर पडली.

1668 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पुरातत्व खात्यातर्फे सुमारे 8 कोटी रुपये खर्चून या ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मात्र मंदिराचे मूळ बांधकाम जशास ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT