Saptakoteshwar Temple : या मंदिरामुळे गोव्याच्या धार्मिक वैभवात भर; मुख्यमंत्री शिंदे

श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
Maharashtra CM On Shree Saptakoteshwar Temple
Maharashtra CM On Shree Saptakoteshwar TempleDainik Gomantak

Saptakoteshwar Temple : नार्वे-डिचोली येथील सप्तकोटेश्वर मंदिराचे अभूतपूर्व उत्साहात आज शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

शिवकालीन इतिहास असलेल्या या श्री सप्तकोटेश्वर मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सपत्नीक अभिषेक करून श्री सप्तकोटीश्वर चरणी आपली सेवा अर्पण केली.

Maharashtra CM On Shree Saptakoteshwar Temple
Calangute Beach: कळंगुटमधील बाबरेश्वर जत्रेस केळ्यांची जत्रा असे का म्हणतात, घ्या जाणून...

दरम्यान या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

"छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या सरदार घराण्यातील वंशजांच्या हस्ते विधिवत पूजार्चना करून भाविकांसाठी खुले होत असून हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा इतिहास यामुळे उजळला आहे. यामुळे गोव्याच्या धार्मिक वैभवात नक्कीच भर पडणार आहे. मनापासून शुभेच्छा" असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Maharashtra CM On Shree Saptakoteshwar Temple
Mapusa Hospital: म्हापसा जिल्हा रुग्णालयात व्यसनमुक्ती विभाग सुरु

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हटलंय, "बाराव्या शतकातील कदंब राजसत्तेच्या काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व पुरातन वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेले गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर आज, 11 फेब्रुवारीपासून जीर्णोद्धारानंतर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे."

"या मंदिराचा इतिहास विध्वंसकपणे पुसण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केला होता. त्याआधीही 1355 मध्ये या मंदिराची बहामनी राज्यकर्त्यांनी नासधूस केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1668 मध्ये मंदिराची पुनर्बांधणी केली."

"350 वर्षांनंतर म्हणजे 2018 साली या श्रद्धास्थानाचा जीर्णोद्धार पूर्ण करण्यात आला आहे. मुंबईतील वास्तु विधान प्रोजेक्टसचे वास्तु सल्लागार राहुल चेंबुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धार झालेले हे मंदिर आहे."

"छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या सरदार घराण्यातील वंशजांच्या हस्ते विधिवत पूजार्चना करून भाविकांसाठी खुले होत असून हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा इतिहास यामुळे उजळला आहे. यामुळे गोव्याच्या धार्मिक वैभवात नक्कीच भर पडणार आहे. मनापासून शुभेच्छा." असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com