Water supply dainik gomantak
गोवा

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे हणजूणवासीय आक्रमक

कार्यालयावर धडक: दोन दिवसांत समस्‍या न सोडविल्यास मोर्चाचा इशारा

दैनिक गोमन्तक

म्हापसा: गेल्या वर्षभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ हणजूणमधील नागरिकांनी आक्रमकता दाखवत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या म्हापसा येथील कार्यालयातील साहाय्यक अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमार केला.

अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन सादर करून सरकारचा निषेधही करण्‍यात आला. साहाय्यक अभियंता तनय कांदोळकर व दीपक बोरकर यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत देण्‍यात आली, अन्यथा पुन्हा येत्या गुरुवारी आम्ही पूर्ण हणजूवासीयांना बोलवून या ठिकाणी मोठे आंदोलन करणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

डिमेलोवाडा-हणजूण येथील श्री रामपुरुष राष्ट्रोळी ब्राह्मण देवस्थानच्या वतीने हणजुणवासीयांनी सादर केलेल्या या निवेदनात म्हटले आहे, की गेल्या सुमारे एक वर्षापासून आम्हाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासंदर्भातील आमच्या मूलभूत हक्कापासून आम्ही वंचित आहोत. साध्यासुध्या घरगुती वापरासाठीही पाणी मिळणे अशक्य झाले आहे. पाण्याची बिले वेळच्या वेळी भरूनही सरकारकडून हा अन्याय आमच्यावर होत आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी सांगितले, की ही समस्या या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमोर यापूर्वी कित्येकदा मांडलेली आहे. असे असतानाही पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही व उपाययोजना हाती घेतलेली नाही. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण केले जात असले तरी त्यांची ती उत्तरे मुळीच समाधानकारक नाहीत. ते केवळ सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

उल्हास गडेकर, रोहन नाईक, ज्योती म्हापसेकर यांनी सांगितले की खासगी टँकरचे पाणी विकत घेणे आम्हाला परवडत नाही व टँकर आणला तरी ते पाणी साठवून ठेवण्यासाठी आमच्याकडे मोठी भांडी नाहीत. त्यामुळे आमची मोठी गैरसोय होत आहे.

पर्यवेक्षकावर कारवाई करण्याची मागणी

हणजूण भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेला लाईनचा पर्यवेक्षक लोकांचा फोनही घेत नाही आणि कोणताच प्रतिसादही देत नाही. हा कर्मचारी सर्वच बाबतीत बेजबाबदारपणा दाखवत असल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी यावेळी साहाय्यक अभियंत्यांसमोर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT