Mopa Airport: पगार न मिळाल्याने मोपा विमानतळावरील कर्मचारी आक्रमक

मोपा विमानतळ बांधकाम साईटवरील सुमारे 200 कामगारांनी संप पुकारला
Mopa Link Road Latest News
Mopa Link Road Latest NewsDainik Gomantak
Published on
Updated on

MOPA International Airport: मोपा विमानतळावरील कामगार आक्रमक झाले असून येथील कामगारांनी 5 गाड्यांसह अ‍ॅडमिन इमारतीवर दगडफेक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कामगारांनी इमारतीसह गाड्यांच्या काचा फोडल्या असून, सहा महिने पगार नाही तसेच याठीकाणी चांगले जेवण देखील दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.(Mopa airport staff aggressive over non-receipt of salary in goa)

Mopa Link Road Latest News
विश्वजित राणे गोव्याचे मुख्यमंत्री होण्यास उत्सुक

मोपा विमानतळ बांधकाम साईटवरील सुमारे 200 कामगारांनी गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचे थकीत पगार मिळत नसल्याचा आरोप करत आज संप पुकारला. आंदोलक कार्यकर्त्यांनी आक्रमक होत प्रशासकीय इमारतीवर दगडफेक केली आणि जवळपास 5 वाहनांचेही नुकसान केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोव्यातील रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक मोपा विमानतळ प्रकल्प

गोव्यातील रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक म्हणजेच मोपा विमानतळ प्रकल्प. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (MOPA International airport) जवळपास 54 टक्के काम पूर्ण झाले आहे. जे आता या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू होण्यासाठी तयार आहे. विमानतळाच्या कामाला विलंब होण्यामागे अनेक कारणे होती. विविध न्यायालयांच्या निर्बंधांमुळे या बांधकामाला 634 दिवस उशीर झाला आणि त्यात कोरोनामुळे (Covid-19) पुन्हा 3 महिन्यांचा फटका बसला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टर्मिनल इमारत चार टप्प्यात विकसित करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात दरवर्षी 4.4 दशलक्ष विमान प्रवासी हाताळण्याची क्षमता असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात 5.6 दशलक्ष, 9.4 दशलक्ष आणि 13.1 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com