Goa BJP
Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दक्षिणेत नरेंद्र सावईकरांमागे भाजप कार्यकर्ते एकवटले

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

सुशांत कुंकळयेकर

एका बाजूने दक्षिण गोव्यात महिला उमेदवार, या मुद्द्याखाली भाजप नेते फक्त ‘आंधळी कोशिंबीर’ खेळत असताना दुसऱ्या बाजूने मूळ भाजप कार्यकर्त्यांनी मात्र माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांनाच दक्षिण गोव्यातून उमेदवारी मिळावी, यासाठी जोर लावला आहे.

त्या मागणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, काही भाजप निष्ठावान कार्यकर्त्यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांना यासंदर्भात ई-मेल पाठविले आहेत. ‘परकी महिला उमेदवार शोधण्याऐवजी संघटनेशी एकनिष्ठ असलेले सावईकर हे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगले’, असे या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे.

भाजपशी जवळ असलेल्या एका माजी सरपंचांशी संपर्क साधला असता, सावईकर हे हुशार आणि सुशिक्षित आहेत. त्यांचा दक्षिण गोव्यातील सर्व मतदारांशी थेट संपर्क आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी द्यावी, हीच बहुतेक भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला जोर सावईकर यांच्या पाठीमागे लावला असून सावईकर हे संघाच्या मुशीतून वर आल्याने आणि एकदा ते दक्षिण गोव्यातून जिंकून आल्याने भाजपने त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

पक्ष सक्रिय बनलाय, काम सुरू

पणजीत बुधवारी दिवसभर भाजपच्या राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक होऊन त्यात गोव्यासंबंधात निवडणूकविषयक चर्चा करण्यात आली. ‘‘आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली असून दक्षिणेचा उमेदवार कोणीही असो, जो कोण ठरेल, त्याला जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.

लोक शेवटी नरेंद्र मोदींना मते देणार आहेत’’, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. पक्षश्रेष्ठींच्या मनात कोण उमेदवार आहे, ते आम्हालाही कळू शकत नाही; परंतु जो उमेदवार ते जाहीर करतील, त्याच्या विजयासाठी पक्ष एकदिलाने कार्य करणार आहे, असे ते म्हणाले.

लपाछपीचा खेळ अमान्य

एका निष्ठावान कार्यकर्त्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर ‘गोमन्तक’ला सांगितले की, दक्षिण गोव्यात भाजपने जो सध्या लपाछपीचा खेळ चालविला आहे, तो निष्ठावान कार्यकर्त्यांना अजिबात मान्य नाही. कुणीतरी महिला उमेदवार आणून आमच्या डोक्यावर थापण्यापेक्षा आमच्याकडे सावईकर यांच्यासारखा चांगला उमेदवार आहे, ज्याला सर्व मतदारसंघांची खडान् खडा माहिती आहे. त्यांचाच पक्षाने का विचार करू नये, अशी आमची भावना आहे.

सावईकर हे हुशार आहेत. त्यांना कायद्याचे ज्ञान असून ते राज्य कायदा आयोगाचे अध्यक्षही होते. त्यांची खासदार म्हणूनही कामगिरी प्रभावी होती. सर्वांत जास्त महत्त्वाचे म्हणजे, ते सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. अशा स्थितीत त्यांना वगळून दुसऱ्या कुणाला उमेदवारी देण्याचा प्रयोग का करावा, हाच माझा प्रश्र्न आहे.
- ॲड. प्रणव सावर्डेकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT