Goa Politics: ‘आरजी’मुळे मतविभागणी अटळ

Goa Politics: राजकीय निरीक्षक : उमेदवार जिंकल्यानंतर इंडिया आघाडीला पाठिंबा : ‘आरजी’चा दावा
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

अवित बगळे

रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे दोन्ही उमेदवार खासदार म्हणून जिंकून आल्यानंतर ते इंडिया आघाडीला पाठिंबा देतील, असे त्या पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी जाहीर केल्यानंतर ते भाजपविरोधी मते फोडणार, असा आरोप होऊ लागला आहे.

वेगवेगळ्या पक्षांकडून ‘आरजी’ ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप यापूर्वीपासूनच होत आहे. त्यातच आता त्यांनी इंडिया आघाडी उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवूनही जिंकून आल्यानंतर इंडिया आघाडीत सहभागी होण्याचे जाहीर केल्यामुळे ते इंडिया आघाडीच्याच मतांची विभागणी करणार, हे पुरते स्पष्ट झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

‘आरजी’ने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून पक्षप्रमुख मनोज परब तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून रुबर्ट परेरा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी प्रचारालाही सुरवात केली आहे. ‘आरजी’वर सातत्याने भाजपला मदत

Goa Politics
Vishwajeet Rane: रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकांची गरज

करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचा आरोप होऊ लागल्यानंतर आज पक्षप्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषद घेत ‘आपले दोन्ही खासदार हे इंडिया आघाडीला दिल्लीत समर्थन करतील’ असे जाहीर केले.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मागील निवडणुकीत केवळ सात टक्के मते मिळाली होती. त्यांना एकच जागा जिंकता आली होती, तर काँग्रेसला 40 टक्के मते मिळून त्यांनी आठ जागा जिंकल्या होत्या.

Goa Politics
Illegal Construction: ‘त्या’ बंगल्यावर बुलडोझर

तेथे जर काँग्रेस 13 जागा आम आदमी पक्षाला लढवायला देत असेल तर आम्हाला मागील निवडणुकीत दहा टक्के मते मिळाली होती. आम्हाला या जागा काँग्रेस का देऊ शकत नाही, अशी विचारणा परब यांनी केली.

त्यांच्या या पवित्र्यामुळे इंडिया आघाडीची मते विभागली जातील, असे स्पष्ट झाल्याचे या आघाडीतील घटक पक्षांचे मत बनले आहे. ‘आरजी’ हा भाजपला मदत करण्यासाठीच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा आरोप आता केला जाऊ लागला आहे.

वरसत्तास्थापनेसाठी होणार मदत

परब म्हणाले की, आता आम्ही रिंगणातून माघार घेणार नाही. दिल्लीस्थित नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर यापूर्वी काहीतरी राजकीय तडजोडी शक्य होत्या. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसविरोधी मतदान होणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्याने आमच्या पक्षांची त्यांना मदत होईल.

आरजी पक्ष कोणाची ‘बी टीम’ आहे, या आरोपांना आम्ही आता उत्तर देत बसणार नाही. सुरुवातीला सर्वच पक्षांवर असे आरोप केले जातात. आम्ही आमच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकून दाखवू.

- मनोज परब, आरजी प्रमुख

‘आरजी’ने खरे तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे. भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. ते निवडणूक रिंगणात असण्याने आमचीच मते विभागली जातील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

- जुझे फिलीप डिसोझा, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com