Janata Darbar Vasco Dainik Gomantak
गोवा

Janata Darbar Vasco: वास्कोतील दरबारात जनतेऐवजी अधिकारीच!

कोळशासह विविध प्रश्‍न चर्चेत; कचरा समस्या सुटणार का: मुरगाववासीयांचा सवाल

दैनिक गोमन्तक

Janata Darbar Vasco: जनता दरबार या कार्यक्रमाकडे वास्कोतील लोकांनी पाठ फिरवली. या शासकीय सोहळ्यात मोजकेच लोक उपस्थित होते. मात्र सरकारी अधिकाऱ्यांची मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत होती.

जनता दरबारसाठी मिनी सभागृह सरकारी अधिकाऱ्यांनी तुडुंब भरले होते. जनता दरबारला जनताच नाही, अशी स्थिती होती. सकाळी केवळ ११.३० पर्यंत केवळ १६ नागरिकांनीच प्रश्न विचारण्यासाठी नोंदणी केली होती.

कोणत्याही स्थितीत मुरगाव बंदरात होणारी कोळसा हाताळणी बंद करा. हवे तर मी, तुम्हाला जनता दरबारात साष्टांग दंडवत घालतो, अशी आर्त विनवणी सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना आज रवींद्र भवन बायणा येथे झालेल्या जनता दरबारात केली. कोळसा हाताळणी रोखण्याच्या प्रश्‍नावर मंत्री सुदिन ढवळीकर निरुत्तर राहिले.

आज सोमवारी ४ सप्टेंबर रोजी बायणा रवींद्र भवनात जनता दरबार भरवला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यापुढे कोळसा प्रश्न उपस्थित केला. ढवळीकर यावर निरुत्तर झाले. यावेळी आमदार कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर,जिल्हाधिकारी आश्विन चंद्र उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

SCROLL FOR NEXT